TRENDING:

Rice Recipe Video : भात खाऊन कंटाळली नातवंडं, आजीने प्रेमाने बनवले भाताचे कोंडुळे; पाहा संपूर्ण रेसिपी

Last Updated:

Rice Recipe Video In Marathi : भात कोंडुळे आजीची ही रेसिपी आजच्या नवीन पिढीला माहितीच नसेल अशी आहे. त्यामुळे कित्येकांसाठी हा नवा पदार्थ असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तांदूळ म्हणजे सामान्यपणे त्याच्यापासून सामान्यपणे भात बनवला जातो. यानंतर पुलाव, बिर्याणी हे प्रकार. तसंच तांदळाच्या पिठाची भाकरी.  भाकरी, डोसा, इडली अशा पदार्थांमध्ये तांदळाचा वापर होतो. पण तरी हे पदार्थही आता तसे नेहमीचे झालेत. त्यामुळे तांदळाचे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल ना, मग आम्ही तुमच्यासाठी तांदळाची एक हटके खास रेसिपी आणली आहे.
News18
News18
advertisement

एका आजीने तांदळापासून वेगळा असा पदार्थ दाखवला आहे. आजीने भाताचे कोंडुळे बनवले आहेत. आजीची ही रेसिपी आजच्या नवीन पिढीला माहितीच नसेल अशी आहे. त्यामुळे कित्येकांसाठी हा नवा पदार्थ असेल. अगदी काही मोजक्यात साहित्यात आणि कमी कृतीत होणारा हा पदार्थ. यासाठी काय काय लागतं आणि तो कसा बनवायचा? साहित्य आणि कृती पाहुयात.

advertisement

Nistyachi Chutney Recipe Video : खोबरं, लसूण चटणी तर नेहमी खाता; आता बनवून पाहा निस्त्याची चटणी

भाताच्या कोंडुळ्यांसाठी लागणारं साहित्य : तांदूळ, गव्हाचं पीठ, काजू, बदाम, बडीशेप, वेलची, गूळ, मीठ, पाणी, तेल

भाताचे कोंडुळे कसे बनवयाचे कृती

तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात टाकून ते शिजवून घ्यायचे. म्हणजे काय तर आपल्याला तांदळाचा भात बनवून घ्यायचा आहे.

advertisement

भात शिजेपर्यंत 5-6 काजू, 5-6 बदाम एकत्र ठेचून घ्या. चिमूटभर बडीशेप, 4-5 वेलची एकत्र करून त्यांची पूड करून घ्या. गूळ फोडून बारीक करून पावडर करून घ्या.

आता 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घ्या. त्यात थोडं मीठ टाका. आता यात शिजवलेला भात, काजू, बदाम, बडीशेप, वेलची, गूळ सगळं टाकून पीठ मळून घ्या.

advertisement

Chef Kitchen Tips : जगातील सगळ्यात परफेक्ट Omelette कसं बनतं? शेफ रणवीरने सांगितलं सीक्रेट

या पिठाचे गोळे करा. ओल्या कापडावर थालीपीठ थापतो तसं हे पीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठाप्रमाणेच त्याच्यामध्ये होल करून तव्याला तेल लावून त्यावर टाकायचं. लगेच झाकण ठेवायचं. थोड्या वेळाने झाकण काढून कडेने तेल सोडायचं आहे आणि नंतर बाजू परतून घ्यायची. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलं की तव्यावरून काढायचं. भाताचे कोंडुळे तयार.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

@Neel_9268 and @niluchiaaji युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही वेगळी रेसिपी करून पाहा, तुम्ही खा, तुमच्या मुलांनाही द्या आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या आजीच्या हातची असा कोणता गावरान पदार्थ तुम्हाला आठवतो किंवा तुमची आजी बनते तेसुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Rice Recipe Video : भात खाऊन कंटाळली नातवंडं, आजीने प्रेमाने बनवले भाताचे कोंडुळे; पाहा संपूर्ण रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल