नाशिक : आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांची स्वप्ने अपूर्ण राहतात. तर काही जण त्यातूनही न खचता सकारात्मक राहत एक वेगळा मार्ग काढतात आणि यशस्वी होऊन दाखवतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. हातभार म्हणून संघर्षातून 36 वर्षांपूर्वी चालू केलेला संघर्ष सामोसा आज नाशिककरांचे मन जिंकत आहे.
भास्कर गावित यांनी याबाबत सांगितले की, या ठिकाणी सामोसा आणि मुंगभजीही मिळतात. समोसा साधा असाला तरी त्यांच्या चटणीने याची चव काही वेगळीच लागते. गोड आंबट चटणी, दही अशा पद्धतीने ते समोसा विक्री करतात. ते लहान असताना त्यांच्या दाजी साहेबराव पाटील यांनी 1986 मध्ये समोसा विक्रीला सुरुवात केली.
advertisement
लहानपणापासून परिस्थिती हालाखीची असल्याने भास्कर हे त्यांच्याकडेच काम करायचे. त्यांना पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. त्यांनी प्रयत्नही केले. मात्र, त्यात ते यशस्वी झाले नाही. पण आज संघर्ष समोसा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. साहेबराव पाटील वारल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही भास्कर यांनी घेतली.
नाशिकमध्ये त्यांची चव ही खूप दूरवर पोचल्याने त्यांनी हा व्यवसाय बंद करू नये, असा सल्लाही अनेक नाशिककरांनी त्यांना दिला. त्यामुळे परिस्थितीलाही हातभार लागावा यामुळे त्यांनी संघर्ष समोसा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कायम संघर्ष होत असल्याने याचे नाव देखील संघर्ष असेच आहे. गावित हे 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत याठिकाणी समोसा विकतात.
थंड की गरम, सकाळी उपाशी पोटी नेमकं कोणतं पाणी प्यावं, योग्य पद्धत तब्बल 56 आजारांना ठेवते दूर
शालिमार जवळील नेहरू गार्डन परिसरात एका छोट्याशा गालावर गाळ्यावर ते समोसा विकतात. 18 रुपयांना 1 नग तर 30 रुपये प्लेट भजी या दराने ते हे पदार्थ विकतात. त्यांचे हा पदार्थ नाशिकमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. तुम्हालाही येथील चव चाखायची असेल तर तुम्ही याठिकाणी नक्कीच भेट देऊ शकतात.