मुंबईतील विले पार्ले मार्केटमध्ये जयपुरी कॉटन कुर्तीची सर्वत्र चर्चा, कमी दरात चांगली quality मुळे महिलांची मिळतेय पसंती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
जयपुरी कॉटन कुर्ती कलेक्शन यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हे उत्तम क्वालिटीचे आणि परवडणाऱ्यी कुर्ती आहे. त्यांचा कापड अतिशय दर्जेदार आणि खूप आरामदायक आहे.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : सध्या फॅशनचे विविध ट्रेंड्स पाहायला मिळतात. अनेक जण सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी, लेटेस्ट फॅशनच्या उत्तम कुर्ती परिधान करण्यासाठी उत्सुक असतात. तुम्हीही अशा प्रकारच्या उत्तम कुर्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जयपुरी कॉटन कुर्ती कलेक्शन यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हे उत्तम क्वालिटीचे आणि परवडणाऱ्यी कुर्ती आहे. त्यांचा कापड अतिशय दर्जेदार आणि खूप आरामदायक आहे. विशेष म्हणजे फक्त 300 रुपयांना ही कुर्ती मिळत आहे. मुंबईतील विले पार्ले मार्केटमध्ये या अशा उत्तम दर्जाच्या कुर्ती मिळत आहेत. जर तुम्हाला तुमचा लूक आणखी चांगला करायचा असेल, तुम्ही या नवीन जयपुरी कलेक्शन कुर्ती नक्कीच ट्राय करू शकतात.
advertisement
घरात तुळशी लावताना नेमकी काय काळजी घ्यावी, काही दिशा अत्यंत धोक्याच्या, काळजी घेणं महत्त्वाचं
सध्या या जयपूरी कुर्तींचा ट्रेंड आहे. त्यांना खूप पसंतीही दिली जात आहे. या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक डिझाइन्स आणि आकर्षक रंग असलेल्या कुर्ती उपलब्ध आहेत. या परिधान केरून तुम्ही अगदी स्टायलिश दिसाल. यामध्ये अनेक पॅटर्नही उपलब्ध आहेत. महिलांसाठीच्या या कुर्ती अतिशय फॅशनेबल आणि लेटेस्ट दिसत आहेत.
advertisement
थंड की गरम, सकाळी उपाशी पोटी नेमकं कोणतं पाणी प्यावं, योग्य पद्धत तब्बल 56 आजारांना ठेवते दूर
view commentsया कुर्तीची स्ट्रेट फिट स्टाइलही खूप आकर्षक आहे. ही कुर्ती तुम्ही कॅज्युअल फंक्शन्समध्ये अथवा ट्रॅडिशनल फंक्शन मधेही घालू शकता. या कुर्तीमध्ये अनेक साइजही उपलब्ध आहेत. स्मॉल साइजपासून ते XXL साईज यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच स्लिव्हलेस पासून ते फुल्ल हँड स्लिव्हलेसचीही व्हरायटी यामध्ये पाहायला मिळत आहे. किंमतीचा विचार केला असता 300 ते 400 रुपयांदरम्यान, या कुर्ती मुंबईतील विले पार्ले मार्केट याठिकाणी विकल्या जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2024 12:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतील विले पार्ले मार्केटमध्ये जयपुरी कॉटन कुर्तीची सर्वत्र चर्चा, कमी दरात चांगली quality मुळे महिलांची मिळतेय पसंती

