कशी झाली सुरुवात?
किरण फूड या नावाने सुरुवातीला आम्ही खाद्य पदार्थ बनवून विकत होतो. डोंबिवलीकरांना चव आवडल्याने त्यांनी विविध पदार्थांची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. 2019 साली डोंबिवलीतील खंबालपाडा येथे दुकान होते. त्यानंतर लॉक डाऊनमध्ये आम्ही एमआयडीसी येथील विकास नाका परिसरात कॅन्टीन चालवायला सुरुवात केली. या दरम्यान रुग्णांना देखील जेवणाचा डब्बा देत होतो. त्याचवेळी उलटा वडा पाव ही संकल्पना सुरू केली आणि खवैय्यांनी त्याला प्रतिसाद दिला.
advertisement
श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांचं काय आहे महत्त्व? वाचा काय आहे परंपरा आणि कारण
उपवास थाळी
उपवास थाळी मध्ये साबुदाण्याचे थालीपीठ, श्रीखंड, शेंगदाणा चटणी, दही, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याच्या किस हे पदार्थ आहेत. त्यामुळे उपवासाला एकच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तसेच उपवास बटाटा वडा बनवताना शेंगदाण्याचा कूट, अरारोट, बटाटा हे पदार्थ वापरल्याची माहिती चंद्रलेखा रानडे यांनी दिली.
Video : बटाटा वड्याचा वेगळाच प्रकार, पावासोबत नाही तर स्टिकमध्ये अडकवून करतात सर्व्ह
उलटा वडापाव
उलटा वडापाव बनवण्यासाठी पाव फ्रीज मध्ये ठेवला जातो. त्यानंतर या पावाला मध्ये कापून त्यावर लसणाची चटणी आणि बटाटा वड्यासाठी वापरत असलेले बटाट्याचे सारण घातले जाते. हा पाव बेसनाच्या पिठात घोळवला जातो आणि त्यानंतर तेलात सोनेरी होईपर्यंत तळला जातो. त्यानंतर त्याचे चार तुकडे करून चटणी, सॉस, शेव, टाकून हा उलटा वडापाव सजवला जातो. तोंडात टाकताच अरे वा असे खवय्ये आवर्जून सांगतात.
उदरभरण करणे सर्वात महत्त्वाचे असले तरी पौष्टीक खाणे देखील सध्याच्या लाईफ स्टाईलसाठी गरजेचे आहे. त्यामुळे डोंबिवलीतील चंद्रलेखाकडे 100 रुपयात पोटभर थाळी, 200 रुपयात उपवास थाळी, उपवास बटाटा वडा आणि उलटा वडा पाव नक्कीच ट्राय करा. पौष्टीक, चविष्ट आणि पोटभर खाण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल.