advertisement

Video : बटाटा वड्याचा वेगळाच प्रकार, पावासोबत नाही तर स्टिकमध्ये अडकवून करतात सर्व्ह

Last Updated:

वडापावमध्ये अनेक चविष्ट प्रकार आता खायला मिळत आहेत. त्यामध्येच आता मिनीवडा हा प्रकार खवय्यांचे मन जिंकत आहे.

+
News18

News18

ठाणे, 15 ऑगस्ट : मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. वडापावमध्ये अनेक चविष्ट प्रकार आता खायला मिळत आहेत. यामध्ये मसाला वडापाव, चिकन पाव, चकली पाव, बार्बेक्यू वडापाव, भट्टी वडापाव मिळतो. त्यामध्येच आता मिनीवडा हा प्रकार खवय्यांचे मन जिंकत आहे.
ठाण्याच्या कोपरी परिसरात असलेले अष्टविनायक कट्ट्यावर हा मिनीवडा मिळतो. हा कट्टा विणा पंढरीनाथ दाभोळकर चालवतात. येथील मिनीवडा हा आकाराने लहान असून तो एका स्टिकमध्ये अडकवून त्यावर अनेक सॉस, लेस वेफर आणि चीज घालून त्याला सर्व्ह केले जाते. या डिशला मिनीवडा स्टिक असेही म्हणतात. ज्या खवय्यांना पाव खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा मिनीवडा एक उत्तम चविष्ट पर्याय आहे.
advertisement
मिनीवडाचे वैशिष्ट्ये?
सतत बटाटा वडासोबत पाव काय खायचा म्हणून काहीतरी नवीन फ्युजन असा हा मिनीवडा स्टिक प्रकार सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे खवय्ये देखील या युनिक फ्युजनला चांगला प्रतिसाद द्यायला लागल्यामुळे आता प्रत्येक ठाणेकर या ठिकाणी आवडीने मिनीवडा स्टिक आणि भट्टी वडापाव खायला येतात. हा मिनीवडा बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे करून त्याला बेसन लावून तेलात तळला जातो. त्यानंतर ते छोटे छोटे वडे भट्टीवर भाजून घेतले जातात. चार ते पाच वडे एका स्टिकमध्ये अडकवून त्यावर अनेक प्रकारचे सॉसेस, लेस वेफर आणि चीज घालून त्यावर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले जाते. या स्वादिष्ट वडास्टिकला डिशवर सर्व्ह केले जाते.
advertisement
मधुराने सांगितली झणझणीत अन् टेस्टी वाटणाची सिक्रेट रेसिपी; 15 दिवस टिकेल, अन् व्हा टेन्शन फ्री
या मिनीवडा स्टिकची किंमत 50 रुपये अशी आहे. हे मिनीवडा स्टिक खवय्ये अगदी चवी चवीने खातात. या मिनीवाडा स्टिक बरोबरच लोक येथील भट्टी वडापाव देखील आवडीने खातात, अशी अशी माहिती विना दाभोळकर यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Video : बटाटा वड्याचा वेगळाच प्रकार, पावासोबत नाही तर स्टिकमध्ये अडकवून करतात सर्व्ह
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement