श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांचं काय आहे महत्त्व? वाचा काय आहे परंपरा आणि कारण

Last Updated:

श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे.

+
News18

News18

डोंबिवली, 17 ऑगस्ट :  बांगड्या हा सौभाग्याचा महत्त्वाचा अलंकार आहे . शुभ कार्याची सुरुवात होताच वधूच्या हातात हिरवा चुडा भरला जातो. हा हिरवा चुडा सौभाग्याचे लक्षण मानले जाते.  धकाधकीच्या आयुष्यात महिलांचं बांगड्या घालणे कमी झाले. पण,  सणासुदीला आवर्जून बांगड्या भरतात. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा असून या महिन्यात हिरव्या बांगड्यांचं मोठं महत्त्व आहे. या बांगड्याचं अध्यात्मिक महत्त्व डोंबिवलीतील गुरुजी प्रदीप जोशी यांनी सांगितले आहे.
काय आहे महत्त्व?
हिरवा रंग हा सृष्टीचे प्रतीक असून श्रावण महिन्यात वर्षा ऋतू सुरू असल्याने या महिन्यात निसर्ग अधिक हिरवागार झालेला असतो. सृष्टीला आणि दृष्टीला हा हिरवा रंग आनंद देतो. उत्तर भारतात तृतीयेपासून दोलोत्सव सुरु होतो. हा दोलोत्सव पार्वती देवीचा उत्सव मानला जातो. या उत्सवात पार्वतीला निसर्गातील फुल, फळ आणि पानांपासून सजवलं जातं. तिला झोपाळ्यावर बसवून  झोका दिला जातो त्यालाच दोलोत्सव असे म्हणतात. ही प्रथा उत्तर भारतात आहे. त्यावेळी सौभाग्याचे लक्षण म्हणून हिरव्या बांगड्या भरल्या जातात. कोकणात देखील तृतीयेला गौरीची पूजा केली जाते.
advertisement
हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे. म्हणून बुधाचा खडा पाचू देखील हिरव्या रंगाचा असतो. बुद्धीला प्रेरणा मिळते आणि आनंद वाढवतो. हा रंग सुखदायी असल्याचे मानले जाते.
advertisement
काचेच्या हिरव्या बांगड्याच का?
काच ही वाळूपासून बनवली जाते. वाळू हे हे एक सृष्टीतील प्रतिक आहे त्यामुळे काचेच्या बांगड्यांचे महत्त्व अधिक आहे. बांगड्या घातल्यानंतर त्यांच्या हालचालीमुळे रक्ताभिसरण चांगले राहते. स्त्रियांच्या कोमल हाताला भारदस्तपणा येतो असे सांगितले जाते, अशी माहिती जोशी यांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांचं काय आहे महत्त्व? वाचा काय आहे परंपरा आणि कारण
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement