श्रावण महिन्यात शंकराला शिवामूठ का वाहतात? कसे करतात हे व्रत? Video
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी नवविवाहित महिला लग्नानंतर 5 वर्ष श्रावणातील दर सोमवारी शिवामूठ वाहतात. याचे कारण माहिती आहे?
डोंबिवली, 7 ऑगस्ट : श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात. प्रत्येक व्रत वैकल्यामागे काही अध्यात्मिक कारणे सांगितली जातात. श्रावण हा शंकराला आवडणारा महिना आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी नवविवाहित महिला लग्नानंतर 5 वर्ष श्रावणातील दर सोमवारी शिवामूठ वाहतात. शिवामूठ वाहने म्हणजे नेमके काय? हे व्रत करण्यामागचे नेमकी अख्यायिका काय या संदर्भात डोंबिवलीतील शोभना फडके यांनी माहिती दिली आहे.
काय आहे अख्यायिका?
याबाबात प्रचिलित अख्यायिकेनुसार, 'एका राजाला 3 सुना होत्या. त्यामधील एक सून त्याची नाआवडती होती. त्यामुळे तो या सुनेला त्या सुनेला जड भरड खायला देणे, तिला गाई गुरांचा गोठा स्वच्छ करायला लावणे, गुरे चरायला नेणे अशी कामे देत असे. अशीच एकदा गुरे चरायला नेत असताना तिला देव कन्या आणि नाग कन्या जंगलातून जाताना दिसल्या. तिने त्यांना विचारले तुम्ही कुठे निघाला आहत? त्यावर देव कन्या आणि नाग कन्येने उत्तर देत आम्ही श्रावणी सोमवार असल्याने शंकराच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहोत.
advertisement
त्यावेळी तिने विचारले की हे व्रत करून काय होत तर त्यांनी सगळ्यांचे कल्याण होते आणि आपल्याला सौभाग्याबरोबरच आपण सासरच्यांच्या लाडके होतो असे सांगितले. त्यानंतर तिला त्यादिवशी त्या देवळात घेऊन गेल्या आणि हे व्रत कसे करावे याची माहिती देऊन पुढील सोमवारी घरातून सामान घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे पुढील दोन सोमवार तिने केले. तिसऱ्या सोमवारी घरातून निघत असताना घरातल्यानी विचारणा केली आणि राजाच्या आवडीच्या सूनाही ती नेमका काय करते हे बघण्यासाठी तिच्याबरोबर आल्या. मात्र कुठे आहे तुझा देव असे त्यांनी विचारताच तिने शंकराला प्रार्थना केली त्यानंतर सोन्याची पिंड तिथे प्रकट झाली.
advertisement
तिने हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि मी सासरच्यांची नावडती आहे तर आवडती होऊ दे अशी प्रार्थना केली. हे व्रत केल्यानंतर तिला फळ प्राप्त झाले,' अशी अख्यायिका आहे, असं फडके यांनी सांगितलं.
कसे करतात व्रत?
advertisement
पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी जव आणि चौथ्या सोमवारी मूगाची शिवामूठ शंकरावर वाहिली जाते. लग्न झाल्यानंतर पाच वर्षापर्यंत हे व्रत केले जाते अशी माहिती फडके यांनी दिली. या व्रतामागील वैज्ञानिक कारण अन्न दान असून हे वाहिलेले धान्य गरजूना द्यावे असंही सांगितलं जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
August 07, 2023 10:16 AM IST