तुम्हाला माहितीये का श्रावण महिन्यात का पुजतात मंगळागौर? काय आहे महत्त्व?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळगौरीची पूजा केली जाते. यामागं खास कारण आहे.
डोंबिवली, 5 ऑगस्ट: श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात. प्रत्येक व्रत वैकल्यामागे काही अध्यात्मिक कारणे सांगितली जातात. श्रावण हा शंकराला आवडणारा महिना आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी म्हणजेच अन्नपूर्णा देवीचे पूजन केले जाते. हे पूजन करण्यामागचे नेमके कारण काय या संदर्भात डोंबिवलीतील शोभना फडके यांनी माहिती दिली आहे.
काय आहे अध्यात्मिक कथा
समुद्र मंथनाच्या वेळी शंकराने विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना होणारा दाह कमी करण्यासाठी पार्वतीने त्यांच्यावर दुग्ध अभिषेक केला. त्यानंतर विषाचा दाह कमी करण्यासाठी श्रावणात भक्त तुमच्यावर कायम दुग्ध अभिषेक करतील असा आशीर्वाद दिला. त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दर श्रावणात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी विवाहित स्त्रिया मंगळागौरी या नावाने तुझे व्रत करतील. ज्या महिला हे व्रत करतील त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होईल असा वर त्यांनी दिला. त्यामुळे नवविवाहित स्त्रिया हे व्रत करतात अशी कथा आहे. पुराणात मंगळागौरी संदर्भात दोन ते तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात.
advertisement
कशी केली जाते पूजा?
या पूजेत अन्नपूर्णा देवीची मूर्ती नव विवाहित स्त्रिया पूजतात. त्यानंतर श्रावण महिन्यात बहरलेल्या निसर्गातील 16 विविध झाडांच्या पत्री अन्नपूर्णेला अर्पण केल्या जातात. त्यानंतर तिची षोडशोपचार पूजा केली जाते. हे व्रत नवविवाहित महिला पाच वर्ष करतात. व्रत पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांना त्याचे वाण दिले जाते. मंगळागौरीचे खेळ खेळून मंगळागौर जाते, असं फडके यांनी सांगितलं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 05, 2023 7:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
तुम्हाला माहितीये का श्रावण महिन्यात का पुजतात मंगळागौर? काय आहे महत्त्व?