TRENDING:

Sweet Recipe Video : शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी नैवेद्यासाठी झटपट होतील असे 4 स्पेशल गोड पदार्थ

Last Updated:

Margashrish Guruvar Navidya Recipe Video : गोड आणि नैवेद्य म्हटलं की सामान्यपणे शिरा, पुरणपोळी, गाजर हलवा तेचतेच पदार्थ. पण आता या मार्गशीर्ष गुरुवारी काहीतरी वेगळं होऊन जाऊदे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे. देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य म्हणजे गोड पदार्थ... आता काय गोड पदार्थ बनवायचा अशा प्रश्न मार्गशीर्ष गुरुवाचे उपवास करणाऱ्या कित्येक महिलांना पडले असतील. गोड म्हटलं की सामान्यपणे शिरा, पुरणपोळी, गाजर हलवा तेचतेच पदार्थ. पण आता या मार्गशीर्ष गुरुवारी काहीतरी वेगळं होऊन जाऊदे. आम्ही तुमच्यासाठी मार्गशीर्ष गुरुवारी नैवेद्याला बनवता येतील असे 4 स्पेशल गोड पदार्थ आणले आहेत.
News18
News18
advertisement

पहिला पदार्थ

गाजर म्हणजे गाजराचा हलवा, पण गाजरापासून एकदम वेगळी अशी रेसिपी. यासाठी गाजर स्वच्छ धुवून कापून घ्या. त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये टाका, यात गरम करून थंड केलेलं अर्धी वाटी दूध टाका आणि वाटून घ्या. एका गॅसवर पॅन ठेवून त्यात एक चमचा तूप टाका आणि गाजराची पेस्ट टाकून एक मिनिटभर परतून घ्या. आता यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्या. शिजवताना यात पाणी, दूध वगैरे काही घालायचं नाही.

advertisement

आता गॅसवर दुसरं भांडं ठेवा, त्यात दोन वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घ्या, साखर पाण्यात चांगली विरघळून घ्या. साखरेचा पाक नाही करायचा आहे, पण पाणी दाटसर होईल इतकं शिजवा. 5 मिनिटं लागतात.

Poli Recipe Video : पाहताच पुरणपोळी वाटेल पण ही आहे त्रिपुरसुंदरी; तोंडात ठेवताच विरघळणारा एक श्रीमंत पदार्थ

advertisement

आता गाजर शिजायला ठेवलं ते मधे मधे ढवळत राहा. आता यात एक वाटी रवा टाका, जाडा-बारीक कोणताही रवा चालेल फक्त लापशी रवा वापरू नका. आता यात 2 वाटी दूध, रव्याच्या दुप्पट दूध घ्यायचं आहे. दूध गरम करून थंड करून घ्यायचं. मिश्रण चांगलं एकत्र करा, मंद आचेवर सतत ढवळत रवा शिजवून घ्या. फास्ट गॅसवर रवा घट्ट होईल पण शिजणार नाही. आता यात अर्धा चमचा वेलची पावडर टाका. मिश्रण घट्ट होईपर्यंत परतत राहा. आता हे मिश्रण एका भांड्यात हे मिश्रण थंड होण्यासाठी काढून घ्या.

advertisement

आता भांड्यात एक वाटी किसलेलं ओलं खोबरं पाणी न घालता बारीक वाटून घ्या. एका पॅनमध्ये बारीक केलेलं खोबरं, अर्धी वाटी दूध पावडर आणि अर्धी वाटी दूध, अर्धा चमचा दूध टाकून चांगलं परतून घ्या. ओल्या खोबऱ्याऐवज तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता. मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या आणि थंड करून घ्या.

आता गाजराच्या मिश्रणाचे गोळे करा आणि त्याच्यापेक्षा लहान खोबऱ्याच्या मिश्रणाचे गोळे बनवा. गाजराच्या मिश्रणाची पारी करा, त्यात खोबऱ्याचं मिश्रण टाकून गोळा करून घ्या आणि त्याला पॅटीससारखा चपटा आकार द्या. आता कढईत तेल गरम करून हाय फ्लेमवर गाजर आणि खोबऱ्याची टिक्की दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्या.

advertisement

आधी तयार केलेला साखरेचा पाक थोडा गरम करून घ्या, त्यात गाजर आणि खोबऱ्याचे रसगुल्ले टाकून ठेवा. 15-20 मिनिटात चांगले मुरतात. गाजराचा हलवा नेहमी बनवतो. आता हे गाजराचे रसगुल्ले एकदा बनवून पाहा.

दुसरा पदार्थ

एका वाटीत 3 चमचे तांदूळ घ्या, ते स्वच्छ धुवून घ्या. आता यात पाणी टाकून किमान अर्धा तास भिजत ठेवा. भिजलेले तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता गॅसवर कढई ठेवा, त्यात किंचित पाणी टाका जेणेकरून दूध तळाला चिकटणार नाही. दूध टाकून गॅस उकळून घ्या. दूध उकळेपर्यंत थोडे ड्रायफ्रूट्स तुपात भाजून घ्या. आवडत नसतील तर नका टाकू.

Celebrity Recipe Video : मलायका अरोराच्या घरी बनतो महाराष्ट्राचा झणझणीत पदार्थ; पण पद्धत थोडी हटके, तिनेच सांगितली रेसिपी

पुन्हा पॅनमध्ये थोडं तूप घ्या आणि त्यात बारीक केलेले तांदूळ रंग बदलेपर्यंत 5-6 परतून घ्या, तुपात भाजल्याने खिरीला चांगला वेस येतो. तांदूळ चांगले भाजले की गरम करायला ठेवलेल्या दुधाला उकळी आली की त्यात मिक्स करून शिजवून घ्या. बारीक केलेले तांदूळ 5-6 मिनिटात शिजतात. तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये अर्धा कप साखर, दोन कप तांदळासाठी अर्धा कप साखर पुरेशी होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. साखरेत किंचित पाणी टाकून ती वितळून घ्या. गॅस बंद करा. तांदूळ दुधात चांगले शिजले की त्यात वितळवलेली साखर टाकून एकजीव करून घ्या. साखरेचे गट्टे झाले तरी ते खिरीत विरघळतात. आता यात भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड टाका. रबडीसारखी खीर तयार होते.

तिसरा पदार्थ

गॅसवर पॅन घेऊन त्यात एक चमचा तूप टाका. दीड वाटी गायीचं किंवा म्हशीचं दूध घ्या. दुधाला उकळी काढायची नाही. दूध हलकं गरम झालं की एक वाटी जाडा किंवा बारीक रवा टाकून दुधात चांगला मिक्स करून घ्या. रवा पूर्ण घट्ट करून घ्या. एक मिनिटात तो घट्ट होतो. रवा एका भांड्यात काढून थंड करून घ्या, तोपर्यंत कढईत दोन वाटी साखर आणि तीन वाटी पाणी घेऊन साखरेचा पाक तयार करून घ्या. साखर विरघळली वेलची पूड, केसरच्या काड्या टाका. हाताला चिकट लागेल इतकंच उकळून घ्या.

आता थंड करायला ठेवलेला रवा असाच हाताने 5 मिनिटं मळून घ्या. रवा कोरडा झाला असेल तर दूध कोमट करून थोडंथोडं घालून मळा. आता याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्या. कढईत तेल गरम करून तयार केले बॉल्स मध्यम ते मंद आचेवर तळून घ्या. फास्ट गॅसवर तळू नका नाहीतर वरून शिजतील पण आतून कच्चे राहतील. गडद तपकिरी रंगात तळून घ्या. गरम गुलाबजाम हलक्या गरम पाकात टाका. म्हणजे पाक लवकर गुलाबजाममध्ये मुरेल. त्यावर झाकण ठेवून द्या. गुलाबजाममध्ये पाक मुरला की गुलाबाजम तयार. गुलाबजाम प्रिमिक्स, दूध पावडर, मैद्याशिवाय हे गुलाबजाम बनवले आहेत.

चौथा पदार्थ

गॅसवर एक भांडं ठेवा त्यात एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घेऊन त्यात साखर वितळवून घ्या. पाण्याला दोन-तीन मिनिटं उकळून थोडं दाटसर बनवून घ्या. यात अर्धा लिंबाचा रस टाका. म्हणजे पाकाची साखर होणार नाही. तो तसाच राहिल. यात अर्धा चमचा वेलची पूड आणि एक चमचा तूप टाका. जिलेबीला टेस्ट आणि चवही चांगली येत. हवा असेल तर चिमूटभर नारंगी रंग टाका.

आता एका भांड्यात एक कप मैदा, 3 चमचे ताजं दही हातांनीच मिक्स करून घ्या. थोडं थोडं पाणी घेऊन केकच्या बॅटरप्रमाणे बॅटर तयार करा, स्मूथ, सिल्की आणि गुठळे नसलेले. यात पाव चमचा खायचा सोडा टाका. मिक्स करून घ्या. आता दुधाची पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. यात मैद्याचं बॅटर भरा. मेहंदीच्या कोनासारखा कोन बनवून घ्या. एक कोपरा कापून घ्या.

गॅसवर पसरट पॅन ठेवा. त्यात तेल गरम करा आणि जिलेबी सोडून घ्या. या जिलेबी दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत तळून घ्या. जिलेबी गरम आहे, त्यामुळे ती थंड पाकात मिनिटभर बुडवून ठेवा. नंतर नितळून बाहेर काढा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलथापालथ, मंगळवारी कांदा आणि मक्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

Vibha's Mejwani युट्युब चॅनेलवर या रेसिपी दाखवण्यात आल्या आहेत. तुम्ही ट्राय करून पाहा आणि कशा झाल्या आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Sweet Recipe Video : शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी नैवेद्यासाठी झटपट होतील असे 4 स्पेशल गोड पदार्थ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल