आश्रमाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आश्रण प्रतिष्ठाननं आहार केंद्र सुरू केलं. आश्रमासमोर असलेल्या आहार केंद्रात घरगुती पारंपारिक जेवणाचा आस्वाद घेणं पर्यटक पसंत करतात. आहार केंद्रात प्रवेश करताच येथील स्वच्छ सुंदर परिसर दिसतो. जेवणासाठी टेबल खुर्ची किंवा पारंपरिक पद्धतीने खाली बसून जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
Video: सेवाग्राम आश्रमाला भेट देताय? नक्की खरेदी करा ग्रामोद्योगातील या वस्तू
advertisement
परिसरातील लोकांना रोजगार
महात्मा गांधी यांनी सेवाग्राम येथे ग्रामीण रोजगार किंवा ग्रामीण विकासाला चालना दिली. महात्मा गांधी यांच्या विचारांना अनुसरूनच सेवाग्राम गावातीलच लोकांना ज्या ठिकाणी रोजगार मिळाला. 2018 मध्ये सुरू झालेल्या आहार केंद्रात सेवाग्राम परिसरातीलच काही हातांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. सेवाग्राम येथील या आहार केंद्राच्या स्वयंपाक घरात ग्रामीण महिला स्वयंपाक बनवतात. तर सेवाग्राम परिसरातीलच काही तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मातीच्या माठातून पाणी
सेवाग्राम येथील या आहार केंद्रात पारंपरिक पद्धतीने जेवण जेवत असताना ग्रामीण भागातील फ्रीज अशी ओळख असलेल्या मातीच्या माठातूनच थंडगार पाणी पिणे पर्यटक पसंत करतात. मातीच्या माठातील पाणी पिणे शरीरासाठी ही चांगले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच या ठिकाणी मातीची माठ वापरले गेले आहेत. आहार केंद्राच्या बाजूला राहण्याचीही व्यवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सहजच सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
परंपरा जपण्याचा होईल प्रयत्न
सेवाग्राम आश्रम महात्मा गांधींच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. ग्रामीण संस्कृती या ठिकाणी आजही कायम आहे. त्यामुळे महात्मा गांधींच्या विचारांना अनुसरूनच आहार केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनाही एक प्रेरणा मिळते. भविष्यातही जेवणाची ग्रामीण परंपरा कायम ठेवण्याचे व्रत आहार केंद्र जपणार असल्याचं आहार केंद्राचे संचालक सचिन हिडे यांनी सांगितलं.