विदर्भाच्या बहिणाबाई! शिक्षण अवघे दुसरीपर्यंतच पण विविध विषयांवर लिहिल्या भावार्थपूर्ण कविता, एकदा ऐकाच Video

Last Updated:

भावार्थपूर्ण कवितांमुळे विदर्भाच्या बहिणाबाई अशी त्यांची ओळख आहे. कोण आहेत या कवयित्री? कशी झाली त्यांची कविता लिहिण्याची सुरुवात पाहूया

+
News18

News18

वर्धा, 18 ऑगस्ट : कविता आणि ओव्यामुळे कवयित्री बहिणाबाई चाैधरी केवळ खानदेशलाच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्या कविताचे आजही वेगवगेळ्या कार्यक्रामध्ये सादरीकरण केले जाते. विदर्भातही अश्याच एक कवयित्री असून त्यांच्या भावार्थपूर्ण कवितांमुळे विदर्भाच्या बहिणाबाई अशी त्यांची ओळख आहे. कोण आहेत या कवयित्री? कशी झाली त्यांची कविता लिहिण्याची सुरुवात पाहूया
कोण आहेत या कवयित्री?
विदर्भातील या कवियत्रीचे नाव शोभाताई हरिभाऊ कदम आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील रोहणा या छोट्याश्या गावातील शोभाताईंचं वय 85 वर्ष आहे. शोभाताईंच्या भावार्थपूर्ण कवितांमुळे विदर्भाच्या बहिणाबाई अशी त्यांची ओळख आहे. शोभाताई 85 वर्षांच्या वयातही अतिशय उत्साही असून आपला कवितेचा छंद जोपासत आहेत. शिक्षण अवघे दुसरीपर्यंतच मात्र तरीही त्यांना विविध विषयांवरील कविता लिहिण्याची आणि त्यांना चाली देण्याची प्रचंड आवड आहे.
advertisement
वयाच्या 96 पर्यंत कधीही आजारी पडले नाहीत; काय आहे आजोबांच्या हेल्थचा सिक्रेट फंडा?
अंदाजे 14 वर्षांचं वय असताना लग्न झालं. आपल्या कुटुंबीयांसह त्या रोहणा गावात राहतात. डोहाळे जेवण, बारसे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये त्या मोठ्या उत्साहाने गाणी गात असून अनेक गाणी त्यांची स्वरचितही आहेत. 85 वर्षांच्या वयातही त्यांची ही ऊर्जा तरुणाईला लाजवणारीच आहे. या वयातही आपल्या अनोख्या शैलीत कविता त्या गातात. त्यांच्या तडफदार आवाजातील कविता आणि गाणी ऐकून अनेक जण मंत्रमुग्ध होतात. त्यांची प्रत्येक कविता ऐकावीशीच वाटेल अशीच आहे.
advertisement
कशी झाली सुरुवात? 
जुन्या काळात पेन पेन्सिल नव्हती. सुरुवातीला शोभाताई मिळेल त्या वस्तूने अक्षर गिरवायच्या. कधी कोळशाला लेखणी बनवायच्या तर कधी भिंतींना पाटी. मग दिसेल त्या ठिकाणी कवितेची एक ओळ लिहायच्या हळूहळू लिखाणासाठी साधणं मिळाली असे करत करत त्यांनी अनेक कविता तयार केल्या. काही जाणवलेले तर काही अनुभवलेले प्रसंग कवितेतून मांडले.
advertisement
विविध मंचावर झाला गौरव
शोभाताईंच्या सुंदर कवितांनी अनेक पुरस्कार खेचून आणले आहेत. अनेक मंचावर त्यांचा गैरव करण्यात आला. यापुढे देखील शोभाताई कवितांचा छंद जोपासणार आहेत. शोभाताई अवघे सहा सात वर्षांच्या असताना एका कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांची गाणी आणि कविता ऐकून त्यांचे भरभरून कौतुक केलं होतं आजही तो प्रसंग शोभाताई आठवतात आणि अभिमानाने सांगतात. अजूनही शोभाताई विविध विषयांवरच्या कविता लिहितात, चाली देतात आणि गातात सुद्धा शोभाताईंची 85 व्या वयातील ही ऊर्जा,तो निर्भिड आवाज अनेकांना नवी उमेद नवचैतन्य आणि प्रेरणा देत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
विदर्भाच्या बहिणाबाई! शिक्षण अवघे दुसरीपर्यंतच पण विविध विषयांवर लिहिल्या भावार्थपूर्ण कविता, एकदा ऐकाच Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement