वयाच्या 96 पर्यंत कधीही आजारी पडले नाहीत; काय आहे आजोबांच्या हेल्थचा सिक्रेट फंडा?

Last Updated:

वृद्धापकाळातही काम करण्याची शक्ती फार कमी व्यक्तींमध्ये दिसते. पण वर्ध्यातील 96 वर्षीय आजोबा याला अपवाद आहेत.

+
वयाच्या

वयाच्या 96 पर्यंत कधीही आजारी पडले नाहीत; काय आहे आजोबांच्या हेल्थचा सिक्रेट फंडा?

वर्धा, 17 ऑगस्ट: वृद्धापकाळातही काम करण्याची शक्ती फार कमी व्यक्तींमध्ये दिसते. त्यात 96 वर्षांचं वय म्हंटलं की थकलेली, अशक्त आणि बीपी, शुगरच्या औषधी घेणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. मात्र वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील जळगाव बेलोरा या गावचे एक आजोबा या सर्व गोष्टींना अपवाद आहेत. शामरावजी नामदेवराव भोयर असं या आजोबांचं नाव असून त्यांची ऊर्जा तरुणाईलाही अचंबित करणारी आहे.
स्वच्छता म्हणजे जणू छंदच
आजोबांचं वय तब्बल 96 वर्ष आहे. या वयातही आजोबांना डोळ्यांवर साधा चष्मा सुद्धा लागलेला नाही. इतकच नाही तर आजोबा कधीही आजारी पडले नाही. औषधीच्या दुकानातून कधीच आजोबांना औषधीची गरजही पडलेली नाही. फक्त वयानुसार त्यांना ऐकायला येत नाही. त्यामुळे संभाषण करणं अवघड होतं, असं कुटुंबीय सांगतात. खरंतर आजोबांना लहानपणापासूनच स्वच्छता आवडते आणि आता तर स्वच्छता म्हणजे आजोबांचा जणू छंदच झालाय. आपल्या घरचे अंगण आणि परिसर आजोबा स्वच्छ ठेवतात.
advertisement
आजोबांच्या आरोग्याचा फंडा
आजोबांचा आहारही अगदी साधा आहे. न पचणारे किंवा शरीराला हानिकारक असणारे पदार्थ ते खात नाहीत. तरुण वयात आजोबांनी शेतीची काम केली. म्हणजेच मेहनतीची खूप कामे केली आणि वयाच्या 96 वर्षातही आजोबांना स्वस्थ बसवतच नाही. त्यांच्या हाताला काही ना काही काम हवंच असतं, असतं असंही कुटुंबीय सांगतात.
advertisement
आजोबांपासून इतरांनी घ्यावी प्रेरणा
गावकऱ्यांकडून आजोबांचं कौतुक होतं. या वयातही आजोबांना मेहनतीची काम करण्याची आवड आहे. साहजिकच तरुण वयाप्रमाणे ते होणे शक्य नाही. मात्र आजोबा अजूनही काम करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब खरंच कौतुकास्पद म्हणावी लागेल. आजोबांचं मन सकारात्मक आणि खंबीर आहे. त्यामुळेच त्यांचे शरीरही स्वस्थ आणि निरोगी आहे. आजच्या काळात प्रत्येकाने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, अशीच त्यांची दिनचर्या आणि फिटनेस आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
वयाच्या 96 पर्यंत कधीही आजारी पडले नाहीत; काय आहे आजोबांच्या हेल्थचा सिक्रेट फंडा?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement