Tips And Tricks : गोड आणि रसाळ कलिंगड कसं ओळखायचं? प्रसिद्ध डाएटिशियनने सांगितल्या सोप्या ट्रिक्स
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to choose sweet and juicy watermelon : आपल्याला योग्य फळं ओळखता अली तरच त्याचा फायदा अहोतो. नाहीतर फळं बऱ्याचदा कमी पाण्याची आणि अगोड निघतात. मग ती खावीशी वाटतं नाहीत. या समस्येवर आम्ही एक सोल्युशन घेऊ आलो आहोत.
मुंबई : उन्हाळा सुरु झाला की, उन्हाळी हंगामी फळांची बाजारात मोठ्या प्रमाणावर एंट्री होते. आपणही फळ खाण्यासाठी बऱ्याचदा घरी खरबूज, डाळिंब, शहाळं आणि कलिंगड अशी पाणी असलेली फळं आणतो. या फळांचा आपल्या शरीराला खूप अफायदा होतो. कारण या फळांमध्ये मुबलक पाणी असतं आणि ते आपल्या शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतं.
पण आपल्याला योग्य फळं ओळखता अली तरच त्याचा फायदा अहोतो. नाहीतर फळं बऱ्याचदा कमी पाण्याची आणि अगोड निघतात. मग ती खावीशी वाटतं नाहीत. या समस्येवर आम्ही एक सोल्युशन घेऊ आलो आहोत. इंस्टाग्रामवर डाएटिशियन सोनिया नारंग यांनी गोड आणि रसाळ कलिंगड कसं ओळखायचं याच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. चला पाहूया.
असं ओळखा गोड आणि रसाळ कलिंगड..
advertisement
कलिंगडाचा आकार : सर्वात आधी कलिंगडाचा आकार पाहा. यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. लांब कलिंगडाऐवजी गोल कलिंगड निवडा. कारण गोल कलिंगडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि लांब कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर गोल कलिंगडामध्ये साखरेचे प्रमाण सर भागांत समान असते आणि ते अधिक समान प्रमाणात पिकतात.
कलिंगडावरील पॅच : पांढऱ्याऐवजी पिवळे पॅचेस असलेला कलिंगड निवडा. कारण कलिंगड जमिनीवर जिथे वाढतात, तिथे पिवळे पॅचेस तयार होतात. ते जितके जास्तवेळ तिथे असतात, तितके जास्त ते पॅचेस गडद होतात. म्हणजेच पिवळा डाग साखर बनण्यास जास्त वेळ मिळाला, तर पांढरे पॅचेस म्हणजे तो कलिंगड शेतातून लवकर आणला गेला आहे.
advertisement
advertisement
कलिंगडावरील रेषा : ज्या कलिंगडावर रेषा जवळजवळ आहेत ते कलिंगड निवडा. रेषा एकमेकांपासून दूर असतील तर कलिंगड निवडू नका. कलिंगडावरील या रेषा फळ पिकताना तयार होणार नैसर्गिक भाग आहेत. त्या जितक्या जास्त जवळ असतील तितके जास्त कलिंगड पिकलेले असण्याची शक्यता असते. कारण या रेषा कलिंगडाला पाणी आणि पोषक तत्वांचे वाहतूक करण्यास मदत करतात. जवळच्या रेषा अधिक दाट जाळे दर्शवतात, ज्यामुळे साखर संपूर्ण कलिंगडामध्ये सामान प्रमाण वितरित होते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 3:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : गोड आणि रसाळ कलिंगड कसं ओळखायचं? प्रसिद्ध डाएटिशियनने सांगितल्या सोप्या ट्रिक्स







