advertisement

US North Korea: इराणमध्ये युद्ध, तर कोरियात सराव! ट्रम्प यांचा डबल गेम!किम जोंग उनच्या दारात अमेरिकन फौजा

Last Updated:

Us North Korea War: अमेरिका आता पुढील लक्ष्य कोणत्या देशाला करणार याची चर्चा सुरू आहे. अशातच आता मोठी घडामोड समोर आली आहे. उत्तर कोरियाच्या दारात अमेरिकेचं नौदल दाखल झालं आहे.

इराणमध्ये युद्ध, तर कोरियात सराव! ट्रम्प यांचा डबल गेम!किम जोंग उनच्या दारात अमेरिकन फौजा
इराणमध्ये युद्ध, तर कोरियात सराव! ट्रम्प यांचा डबल गेम!किम जोंग उनच्या दारात अमेरिकन फौजा
US North Korea: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरा अटक केल्यानंतर अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारले आहे. इस्रायलच्या सोबतीने अमेरिकेने हल्ला करून इराणची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, इराणने जोरदार कडवा प्रतिकार सुरू केला आहे. १० दिवसानंतरही युद्ध सुरू असून वार-पलटवार सुरू आहेत. अशातच अमेरिका आता पुढील लक्ष्य कोणत्या देशाला करणार याची चर्चा सुरू आहे. अशातच आता मोठी घडामोड समोर आली आहे. उत्तर कोरियाच्या दारात अमेरिकेचं नौदल दाखल झालं आहे.
एकीकडे इराणसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धात अमेरिका आणि इस्रायल क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आशिया खंडातही मोठी लष्करी हालचाल सुरू केली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने अचानक ‘फ्रीडम शील्ड’ (Freedom Shield) नावाचा भव्य संयुक्त सराव सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. हजारो सैनिकांच्या सहभागाने होणाऱ्या या हालचालीमुळे उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन याच्यावर दबाव वाढवण्याची ही ट्रम्प यांची मोठी रणनीती असल्याचे मानले जात आहे.
advertisement

काय आहे 'फ्रीडम शील्ड' सराव?

हा युद्धाभ्यास प्रामुख्याने १९ मार्चपर्यंत चालणार आहे. दक्षिण कोरियाच्या 'जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ'नुसार, यामध्ये दक्षिण कोरियाचे १८ हजार सैनिक सहभागी होत आहेत. हा सराव संगणक सिम्युलेशन (Computer Simulation) आणि प्रत्यक्षात जमिनीवर होणारे प्रशिक्षण (Warrior Shield) अशा दोन भागांत विभागला गेला आहे. जरी अमेरिकेने आपल्या सहभागी सैनिकांची अधिकृत संख्या जाहीर केली नसली, तरी या सरावाचे भव्य स्वरूप पाहता आशियातील सामरिक समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
advertisement

किम जोंग उनवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी नेहमीच अशा सरावांना ‘युद्धाची पूर्वतयारी’ म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आपली क्षेपणास्त्र चाचणी केली होती. समुद्रातील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. यावेळी किम जोंग स्वत: उपस्थित होते, असेही वृत्तही समोर आले होते.
इराणमध्ये आधीच युद्ध सुरू असताना, अमेरिकेने दक्षिण कोरियात आपली ताकद दाखवणे, हे उत्तर कोरियाला इशारा देणारे मानले जाते. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर कोरिया यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आपले काही लष्करी संसाधनं मिडल ईस्टकडे वळवण्याच्या तयारीत असून, त्याआधी आशियातील आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी हा सराव केला जात आहे.
advertisement

संरक्षण की युद्धाचा इशारा?

अमेरिका आणि दक्षिण कोरियाने हा सराव पूर्णपणे 'बचावात्मक' असल्याचा दावा केला आहे. "आमचा उद्देश केवळ सुरक्षा सहकार्य मजबूत करणे हा आहे," असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, जागतिक राजकारणाच्या नकाशावर एकाच वेळी दोन आघाड्यांवर सक्रिय राहून ट्रम्प यांनी आपल्या विरोधकांना मोठा संदेश दिला आहे. आता किम जोंग उन या दबावाचा सामना कसा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
US North Korea: इराणमध्ये युद्ध, तर कोरियात सराव! ट्रम्प यांचा डबल गेम!किम जोंग उनच्या दारात अमेरिकन फौजा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement