advertisement

Thalapathy Vijay Divorce: 'घटस्फोट हवा आहे पण...', संगीताला सोडायचं नाहीय विजयचं घर, कोर्टात दाखल केली नवी याचिका

Last Updated:
Thalapathy Vijay Divorce Update: संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दिला असला तरी, आता तिने एक नवी याचिका दाखल करून खळबळ उडवून दिली आहे.
1/10
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि तमिळनाडूच्या राजकारणात नुकतीच एन्ट्री केलेला थलापती विजय सध्या एका मोठ्या वैयक्तिक संकटात सापडला आहे. २७ वर्षांच्या सुखी संसारानंतर विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्णलिंगम यांच्यातील दुरावा आता कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचला आहे.

2/10
संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दिला असला तरी, आता तिने एक नवी याचिका दाखल करून खळबळ उडवून दिली आहे. संगीताने कोर्टाकडे मागणी केली आहे की, तिला तिच्या सध्याच्या वैवाहिक घरातून बाहेर काढले जाऊ नये आणि तिथे राहण्याचा तिला कायदेशीर अधिकार मिळावा.

3/10
घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना अनेकदा पती-पत्नी वेगळे राहतात. मात्र, संगीताला अशी भीती आहे की तिला तिच्या हक्काच्या घरापासून दूर केले जाऊ शकते. म्हणूनच तिने चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात धाव घेत अंतरिम आदेश जारी करण्याची विनंती केली आहे.

4/10
या नव्या याचिकेमुळे विजयच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या नव्या याचिकेमुळे विजयच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. "घटस्फोट झाला तरी मला माझ्या मुलांसोबत याच घरात राहायचे आहे," असा पवित्रा संगीताने घेतल्याचे समजते.
advertisement
5/10
संगीताने 'विशेष विवाह अधिनियम १९५४' च्या कलम २७(१)(a) अंतर्गत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जात तिने विजयवर विवाहबाह्य संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

6/10
अनेक रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तृषा कृष्णन आणि विजय यांच्या वाढत्या जवळीकीमुळेच हा संसार मोडला आहे. नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात दोघे एकत्र दिसल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

7/10
विजय आपली पत्नी आणि मुलांच्या भविष्यासाठी पोटगी म्हणून तब्बल २५० कोटी रुपये देण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. मात्र, संगीताला पैशांपेक्षा घराचा अधिकार महत्त्वाचा वाटत आहे.

8/10
विजय ख्रिश्चन असला तरी त्याने संगीतासाठी २५ ऑगस्ट १९९९ रोजी हिंदू पद्धतीने लग्न केले होते. त्यांना जेसन संजय हा मुलगा आणि दिव्या साशा ही मुलगी आहे. जेसन सध्या परदेशात चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेत आहे.

9/10
एका चाहत्यापासून पत्नीपर्यंतचा संगीताचा प्रवास हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एक आदर्श मानला जात होता, पण आता या नात्याचा अंत अत्यंत क्लेशदायक होताना दिसत आहे.

10/10
विजयने नुकताच स्वतःचा राजकीय पक्ष 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) स्थापन केला आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तो तयारी करत असतानाच, हे कौटुंबिक प्रकरण त्याच्या प्रतिमेला तडा देऊ शकते. तृषासोबतचे त्याचे कथित संबंध आणि पत्नीने केलेले आरोप विरोधकांसाठी आयते कोलीत ठरू शकतात.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement