अभिनेत्री गिरीजा ओक जिला एक मुलगा आहे, ज्याचं नाव कबीर. जो शाळेत आहे. गिरीजा कबीरला टिफिनमध्ये काय देते हे तिने सांगितलं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल गिरीजा दररोज मुलासाठी टिफिन बनवत नाही. ती फक्त एकच दिवस टिफिन बनवून देते, तरी तिचा मुलगा महिनाभर शाळेत टिफिन खातो. आता हे कसं काय? तर यामागील आयडियाही तिने सांगितली आहे.
advertisement
Celebrity Recipe Video : मुलांच्या डब्यासाठी रेणुका शहाणे बनवायची शॉर्टकट पुरणपोळी; सांगितली रेसिपी
गिरीजा ओकने सांगितलं की, "माझ्या मुलाच्या शाळेत अशी सिस्टम आहे की त्याला दररोज टिफिन द्यावं लागत नाही. महिन्यातून फक्त एकदाच टिफिन द्यावा लागतो. पण तो फक्त त्याच्यासाठी नाही तर संपूर्ण क्लाससाठी. वर्गात 22-23 मुलं आहेत तर मग त्यानुसार महिन्यातून एकदा तुमचा टर्न येतो. मग महिन्यातून एकदाच जेवण बनवायचं आहे पण 25 लोकांचं. कारण मुलांसह शिक्षक, हेल्पर्सही तेच खातात"
गिरीजा ओक पुढे म्हणाली, "असं दररोज प्रत्येकाच्या घरातून जेवण येतं. भात, डाळ, पोळी, भाजी आणि सोबत सलाड, उन्हाळा असेल तर ताक वगैरे असे पदार्थ ठरलेले असतात. पण यातच इतका वेगळेपणा असतो कारण कुणी पंजाबी आहे, कुणी बंगाली आहे, कुणी गुजराती आहे, मी महाराष्ट्रीय आहे आणि आम्हाला आमच्या भागात ज्या पद्धतीने जेवण बनवलं जातं, त्या पद्धतीचं जेवण देण्यासाठी प्रोत्साहीत केलं जातं"
Celebrity Recipe : करीना कपूरला आवडते कोकी, काय आहे हे, बनवतात कसं, Watch Video
"मुलं वेगवेगळ्या पद्धतीचं खातात पण एकाच वेळी सगळ्यांकडे सारखं जेवण असतं. त्यांना वेगवेगळी संस्कृतीही समजते"
"तसंच ज्या दिवशी ज्या मुलाच्या घरातून जेवण असतं तो मुलगा स्पेशल असतो. म्हणजे रांग असेल तर तो त्या रांगेत पहिला उभा असेल, खेळताना तो खेळ सुरू करणार, वर्गात काही वाचायचं असेल तर तो पहिलं वाचणार", असंही गिरीजाने एका मुलाखातीत सांगितलं.
