TRENDING:

Womens Day: पतीचा व्यवसाय बुडाला, भोसले काकूंनी पदर खोचला; 25 वर्षांपासून पुण्याचं काम, कोल्हापुरात प्रसिद्ध आहे हे ठिकाण!

Last Updated:

Womens Day: कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात भोसले काकी यांची खानावळ आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही खानावळ त्या आवडीनं चालवत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापुरातील भोसले काकी होय. पतीचा व्यवसाय तोट्यात गेल्यावर सगळे खचले होते. परंतु, सत्यभामा भोसले यांनी पदर खोचला आणि सूत्रे हातात घेतली. स्वयंपाकाची आवड असल्याने खानावळ सुरू केली आणि कुटुंब सावरलं. आता 73 वर्षांच्या भोसले काकींसाठी खानावळ चालवणं हे आवडीचं काम झालंय. कोल्हापूरला आलेल्या मुलांना चांगला स्वयंपाक करून खाऊ घालणं, हे माझं कर्तव्य असल्याचं भोसले काकी मानतात. महिला दिनानिमित्त लोकल18 ने त्यांच्याशीच संवाद साधला आहे.

advertisement

कोल्हापुरातील सायबर चौक येथे असणाऱ्या एसटी कॉलनी परिसरामध्ये भोसले काकी यांची खानावळ आहे. ती गेल्या 25 वर्षांपासून त्या ही खानावळ चालवत आहेत. ही खानावळ चालू करण्यामागेही एक कथा आहे. भोसले काकींच्या पतीचं कोल्हापुरात औद्योगिक वस्तू आणि साहित्याचं दुकान होतं. ते काही कारणाने तोट्यात जाऊ लागलं. त्यानंतर कोणतं उत्पन्नाच साधन नसल्याने त्यांनी खानावळीचा पर्याय निवडला. त्या सुरुवातीला जवळच राहणाऱ्या दोन-तीन मुलांना जेवण देऊ लागल्या. त्यांच्या हाताची चव आणि मायेनं दिलेल्या जेवणामुळे ते सर्वांनाच आवडू लागलं. हळूहळू त्यांचा हा व्यवसाय वाढू लागला. आजच्या घडीला काकींच वय 73 आहे आणि गेल्या 25 वर्षांपासून आजतागायत ही खानावळ चालू आहे.

advertisement

Womens Day: हसू हरवलेले चेहरे अन् नशिबाच्या फासातील स्त्रिया, बुधवार पेठेतील महिलांची देवदूत

कशी झाली सुरुवात ? 

सत्यभामा भोसले म्हणजेच भोसले काकी या कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात त्यांच्या उत्कृष्ट जेवणामुळ प्रसिद्ध आहेत. 1973 च्या दरम्यान भोसले काकी यांच्या पतीच्या व्यवसायात तोटा झाला. त्यानंतर उत्पन्नच साधन मिळणं कठीण झालं. काकींना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलंही हळूहळू मोठे होत होती. त्यांच्या शिक्षणाचा, पोटा - पाण्याचा खर्च बघनं शक्य नव्हतं. त्यामुळे पर्याय म्हणून भोसले काकींनी अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. त्यात भोसले काकींनी 8 वर्ष पाळणाघर चालवलं. त्यानंतर खानावळीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या जोरावरच त्यांनी दोन मुलींची लग्नं केली.

advertisement

पतीचं आजारपण आणि व्यवसायाची कसरत

भोसले काकी खानावळ चालवून घर प्रपंच सांभाळत होत्या. तेव्हा पती आजारी पडले. ते अंथुरणाला खिळून राहिल्याने त्यांचा आजारपण आणि खानावळ अशी दुहेरी कसरत होत होती. तरीही पतीची सेवा आणि मुलांना जेवण हे दोन्ही कर्तव्य मानून दोन्ही केलं. पुढे पतीचं निधन झालं. मात्र, खानावळ सुरूच असून आजही मी स्वत: लवकर उठून सगळा स्वयंपाक बनवते, असं काकी सांगतात.

advertisement

दीड वर्षांचं बाळ अन् गंभीर आजार, काळजावर दगड ठेवून घेतला निर्णय, दहावी पास महिलेची मोठी भरारी

मुलांना चांगलं खाऊ घालणं हे माझं कर्तव्यच ! 

आज भोसले काकी यांच्या 73 व्या वर्षी प्रचंड उत्साहन आणि आवडीने खानावळ चालवतात. त्यांच्या दोन मुली, मुलं ही या वयात आता विश्रांती घ्यायला सांगतात. मात्र भोसले काकींना रुचकर जेवण खाऊ घालण्याची आवड आहे. मोकळं बसण्याची सवय नाही. एकदा जर बसलं की बसलंच. आपलं शरीर फिट राहावं यासाठी आवडीचं काम करावं. मला मुलांना चांगलं-चुंगलं खाऊ घालायला आवडतं. या व्यवसायानं मला आयुष्यभर साथ दिलीये. त्यामुळे मुलां-मुलींना खाऊ घालणं हे माझं कर्तव्य असल्याचं मानते, असं भोसले काकी सांगतात.

इतर महिलांना रोजगार

भोसले काकींची खानावळ लोकप्रिय होऊ लागली. जेवण चांगलं असल्यानं मुला-मुलींची गर्दी वाढू लागली. त्यात भोसले काकींचा दराराच तसा असल्यानं कोणत्याही अडचणीशिवाय मेसमध्ये मुलं आणि मुलीही घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी यायला लागले. त्यामुळे त्यांनी- महिलांना मदतीला घेतले. त्यातून त्यांना देखील रोजगार मिळाला. तसेच त्यांनी एका महिलेला घर बांधून देण्यासही मदत केली.

कसं असतं जेवण?

भोसले काकींच्या खानावळीमध्ये आठवड्यातून एकदा अंडी, पंधरा दिवसातून एकदा चिकन, शाकाहारी लोकांसाठी दोन भाज्या आणि सोबत श्रीखंड, गुलाबजाम, खीर, कोशिंबीर पनीर असे रुचकर पदार्थ विद्यार्थ्यांना अगदी प्रेमाने देत असतात. त्याचबरोबर इच्छेप्रमाणे त्या जेवणही बनवून देतात. विद्यार्थ्यांनी आवडीने आणि पोटभर जेवावं हीच त्यांची इच्छा असते. विद्यार्थ्यांना मायेचा घास देणाऱ्या भोसले काकी महिला दिनी अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Womens Day: पतीचा व्यवसाय बुडाला, भोसले काकूंनी पदर खोचला; 25 वर्षांपासून पुण्याचं काम, कोल्हापुरात प्रसिद्ध आहे हे ठिकाण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल