मुंबई : मुंबई शहरात उगम पावलेला वडापाव हा सगळीकडचं प्रसिद्ध आहे. सहज उपलब्ध आणि स्वस्त स्नॅक्सपैकी एक आहे. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. पण जर तुम्हाला तुमच्या वडापावमध्ये उकडलेल्या बटाट्याच्या जागी मांसाहारी आणि स्वादिष्ट काहीतरी ख्यायचे असेल तर मुंबईतील अंधेरीमध्ये चिकन वडापाव खाऊ शकता. हा वडापाव खाण्यासाठी नॉन व्हेज प्रेमींची मोठी गर्दी असते.
advertisement
कुठे खाल वडापाव?
मुंबई आपल्या स्वादिष्ट वडापावसाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच्या वडापाव व्यतिरिक्त, तुमच्या चवीनुसार अनोखी वडापाव रेसिपी आहे ते म्हणजे चिकन वडापाव. हाच चिकन वडापाव अंधेरीतील तेलीगल्ली या स्ट्रीट स्टॉल खायला मिळत आहे. प्रशांत सरतापे हा वडापाव या ठिकाणी विकत आहेत.
पुण्यातील झटका भेळची बातचं न्यारी, 76 वर्षांपासून जपलीय तिचं चव, खवय्यांची असते 'इथं' गर्दी
कसा बनवला जातो वडापाव?
या वडापावमध्ये चिकन अगदी बोनलेस घेवून त्याचं मिक्सरमध्ये बारीक ग्रँट केले जाते. त्याचे बारिक गोळे करून त्यामध्ये सर्व घरगुती मसाले वापरून, लहान गोळे तयार करून त्यात चण्याच्या पिथामध्ये मिक्स करून डीप फ्राय केले जाते. हा चिकन वडापाव खाण्यासाठी अगदी टेस्टी लागतो. मुळात जे नॉन व्हेज प्रेमी खवय्ये आहेत ते आवर्जून ही चिकन वडापावची हटके चव चाखायला येत असतातच. या चिकन वडापावची किंमत ही 30 रुपये आहे.
काश्मिरी गुलाबी चहा आता कोल्हापुरात, आरोग्यासाठीही फायदेशीर, रेसिपी पाहा
खवय्यांसाठी वाडापावमध्ये काहीतरी नाविन्य आण्याचा प्रयत्न केला असून त्यांना त्यात चागला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो. माझे स्ट्रीट स्टॉल अंधेरीतील तेली गल्ली या भागात आहे. वडापाव विकणाऱ्याचे अनेक स्टॉल असून देखील त्यातील हा एक चिकन वडापाव ही लोकांचा पसंतीस आलेला आहे, असं प्रशांत सरतापे यांनी सांगितलं.