दोसती किचनची सर्वात जास्त चर्चेत असलेली डिश म्हणजे पगार राईस. महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत खिशाला परवडेल अशा दरात भरपूर क्वांटिटीमध्ये चायनीज खाण्याचा अनुभव देणारी ही डिश तरुणांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. याठिकाणी बनणारे सर्व पदार्थ पूर्णपणे सनफ्लावर तेलामध्ये तयार केले जात असून, ताज्या आणि फ्रेश साहित्याचा वापर केला जातो, हीसुद्धा ग्राहकांना आवडण्यामागची एक मोठी कारणं आहेत.
advertisement
mango Murabba Recipe :आंब्याचा मुरंबा पाहून तोंडाला पाणी सुटेल; Video पाहून लगेच बनवा!
फक्त कमी किमती नव्हेत तर क्वालिटी, फ्रेशनेस आणि चव यांचा ताळमेळ साधत हे ठिकाण लवकरच अंधेरी परिसरातील फूडीजसाठी एक बेस्ट स्टॉप बनत आहे. विविध चायनीज राईसपासून व्हेज–नॉनव्हेज कॉम्बोपर्यंत सर्व काही आपल्या बजेटमध्ये मिळत असल्याने दोस्ती किचनकडे सध्या खवय्यांची चांगलीच गर्दी दिसत आहे. ही दोस्ती किचन अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशन आणि गुंदवली मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे.





