शरद यांची सुरुवातीला पंचवटीतील रामसेतू पुलाजवळ एक छोटी चहाची गाडी होती. पंचवटीतील मुख्य भाग असल्याने यांच्याकडे रोज अनेक लोक येत असत. बरेच गोरगरीब नागरिक यांच्याकडे जेवणाची विचारपूस करत होते. यावेळी शरद यांना आपण भोजनालय सुरू करून एक जनसेवा करू अशी कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी 40 वर्षांपूर्वी फक्त 5 रुपयात अन्न सेवा सुरू केली होती. या सेवेत त्यांचा मुलगा रवींद्र आणि संपूर्ण कुटुंब त्यांना मदत करत असे.
advertisement
श्रीमंत असो अथवा गरीब, या अजय भोजनालय आणि जनसेवा केंद्रातील घरगुती जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय पंचवटीतून निघत नाही. तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने यात कुठलाही व्यवसाय नको या विचारामुळे शरद सराफ यांच्याकडे जेवण फक्त 35 रुपयांत आता मिळत असते.
इतकेच नाही तर कुणाकडे पैसे नसले तरी या ठिकाणी त्या लोकांना मोफत जेवण दिले जात असते. आजही हीच सेवा शरद यांचे चिरंजीव रवींद्र हे पुढे नेत आहेत. आज 35 रुपयात यांच्याकडे सर्व लोक पोटभर जेवण करून जात असतात. तीन भाकरी, रस्सेदार भाजी आणि भात असे यांच्याकडे जेवण मिळत असते. तुम्ही देखील नाशिकला आलात तर पंचवटी येथील राम सेतू पुलाजवळील शनि मंदिराच्या बाजूला असलेल्या अजय भोजनालयाला नक्की भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या.