Domestic Workers Scheme : धुणी भांडी करणाऱ्या महिलांसाठी सरकारकडून महामंडळाची स्थापना, कोण कोणते फायदे मिळणार? A TO Z माहिती

Last Updated:

Welfare Scheme For Domestic Workers: महाराष्ट्र सरकारने धुणीभांडी करणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण महामंडळ स्थापन केले आहे. या माध्यमातून या महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत.

News18
News18
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे. मुख्यतहा धुणीभांडी करणाऱ्या महिलांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या योजनेतून घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत तसेच सन्मानधन आणि भांड्यांचा संच मिळणार आहे. राज्य सरकारच्या या पुढाकारामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा तसेच सुरक्षित जीवनमानाची खात्री मिळणार आहे,असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ''महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण महामंडळ'' स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून विविध योजना थेट लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यात येतील. यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे जीवनमान सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे.या योजनेतून महिलांना आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षा मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.
धुणीभांडी करणाऱ्या महिलांना मोठे फायदे
धुणीभांडी करणाऱ्या महिलांना आता अनेक प्रकारचे लाभ मिळणार आहेत. यामध्ये प्रसूतीसाठी मदत, अंत्यविधीसाठी आर्थिक सहाय्य, अपघातामुळे मदत, तसेच वैद्यकीय मदतीसाठी तरतूद यांचा समावेश आहे.याशिवाय 10 हजार रुपयांपर्यंत थेट आर्थिक लाभही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत, 60 वर्षांपर्यंत अशा घरकामगार महिलांना विविध शासकीय सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे, जे त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवेल.
advertisement
नोंदणी प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी वय 18 ते 60 वर्षे असावे आणि मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस धुणीभांडी किंवा इतर घरगुती काम केलेले असावे. इच्छुक महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येईल. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये जन्मतारीख पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत आणि 90 दिवस काम केले असल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
advertisement
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा आणि जीवनमान सुधारण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे भवितव्य अधिक सुरक्षित होईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Domestic Workers Scheme : धुणी भांडी करणाऱ्या महिलांसाठी सरकारकडून महामंडळाची स्थापना, कोण कोणते फायदे मिळणार? A TO Z माहिती
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement