TRENDING:

Mutton : अस्सल गावाकडील कारणाचे मटण, 8 वर्षांपासून प्रसिद्ध, एकदा खाल तर चव विसरणार नाहीत, Video

Last Updated:

गावाकडील कारणाच्या मटणाची चव आणि घरगुती मसाले वापरून नाशिकमधील वाघ्या मुरळी हॉटेल हे नाशिककरांना गेल्या 8 वर्षापासून गावाकडील मटनाच्या चवीचा अनुभव देत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : नॉनव्हेज म्हंटलं म्हणजे नॉनव्हेज प्रेमींना आठवते ते मटण आणि चिकन. त्यातल्या त्यात हेच मटण गोंधळतल्या कारणाच्या मटणासारखे असले म्हणजे मग मटनावरचा ताव आवरणे मुश्किलच. अश्याच गावाकडील कारणाच्या मटणाची चव आणि घरगुती मसाले वापरून नाशिकमधील वाघ्या मुरळी हॉटेल हे नाशिककरांना गेल्या 8 वर्षापासून गावाकडील मटनाच्या चवीचा अनुभव देत आहे.
advertisement

वाघ्या मुरळी हे हॉटेल मटणासाठी नाशिकमध्ये खूप प्रसिद्ध आहेयांच्याकडे रोज कमीत कमी 12 ते 15 किलो मटण हे एकसोबत शिजत असते. त्यामुळे त्याला कारणाच्या मटणाची चव ही मिळत असल्याचे हॉटेल चालक प्रसाद हिरे यांनी सांगितले.

advertisement

काय आहे या ठिकाणी असलेल्या मटणाची खासियत?

नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मटण आणि चिकन हे मिळत असते. परंतु या हॉटेलला गोंधळाच्या कार्यक्रमात ज्या पद्धतीने मटण शिजवले जाते आणि बनवले जाते त्याच पद्धतीचा वापर करून हे मटण शिजवले जाते. त्यातल्या त्यात प्रसाद यांच्या आई या गावाकडील असल्याने ते स्वतः हे सर्व मसाले घरी बनवत असतात. आणि प्रसाद या मसाल्यांचा वापर करून स्वतः त्यांच्या हाताने हे मटण बनवीत असतात. या मटणाची खासियत अशी आहे की मटणाचा खाण्यासाठी चांगला असलेला भाग हे सर्व प्रत्येकाच्या प्लेटमध्ये देत असतात आणि याची किंमतही 280 पासून सुरू होते. तर स्पेशल मटण आणि साधी थाळी असे यांच्याकडे प्रकार देखील आहेत.

advertisement

महिलेची कमाल! घरात बसून उभ केलं लाखोंचं साम्राज्य, व्यवसाय ऐकून तुम्हीही सुरू कराल 'हा' बिझनेस

काय आहे कारणाचे मटण हा प्रकार?

गावाकडील भागात आपण जर कधी गोंधळाला गेलात तर त्या गोंधळात प्रसाद म्हणून एकाच वेळेला तब्बल 10 ते 20 किलो बकऱ्याचे मटण हे शिजवले जात असतेएकाच वेळेस हे सर्व मटण शिजत असल्याने प्रत्येक भागाची त्यात चव (अर्क) हे येत असते. आणि त्यासाठी मसाले देखील एकत्रित मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याने ती भाजीची चव आणखीनच वाढत असते. त्याच पद्धतीने आपण देखील काहीतरी गावाकडील जेवणाची चव ही लोकांपर्यंत देऊ आणि गावाकडील संस्कृती जपून ठेऊ या हेतूने हे वाघ्या मुरळी हॉटेल प्रसाद यांनी सुरू केले असल्याचे सांगत असतात. यांच्याकडे रोज 12 ते 15 किलो मटण एकाच वेळेस बनवतात आणि इतकेच नाही तर हे मटण रोजच फ्रेश बनत असते. यांच्या या मटणाची चव आता नाशिकच नाही तर आता मुंबईपर्यंत देखील पोहोचली आहे. रविवारी तर यांच्याकडे अक्षरशः वेटिंगमध्ये लोक थांबत असल्याचे दिसते. गावाकडील पद्धतीचा आणि मसाल्यांचा वापर करून हे मटण तयार होत असल्याने अगदी लहान मुलगा देखील या मटणाचा खाण्याचा आनंद घेत असतो.

advertisement

कुठे आहे वाघ्या मुरळी हॉटेल?

नाशिकमधील गंगापूर रोडवरील जिहान सर्कलच्या जवळ असलेल्या रिलायन्स डिजिटल शोरूम शेजारी तुम्हाला हे हॉटेल उपलब्ध आहे. तुम्ही देखील ह्या ठिकाणी जाऊन गावाकडील मटणाचा आनंद घेऊन बघा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Mutton : अस्सल गावाकडील कारणाचे मटण, 8 वर्षांपासून प्रसिद्ध, एकदा खाल तर चव विसरणार नाहीत, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल