ठाण्यातील 'जयश्री कलेक्शन' या दुकानात अतिशय कमी दरात आकर्षक आणि परवडणाऱ्या दरात गणपती बाप्पांसाठी दागिन्यांचा संग्रह उपलब्ध आहे. या ठिकाणी केवळ 30 रुपयांपासून गणेशमूर्तीच्या दागिन्यांची खरेदी करता येऊ शकते. या ठिकाणी विविध प्रकारचे मोदक, मुकुट, कंठी, बाजूबंद, उंदीर मामा, पानसुपारी, शस्त्र अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत.
Coconut Prices: श्रावणात ग्राहकांच्या खिशाला कात्री, नारळाच्या दरात एवढ्या रुपयांनी वाढ, कारण काय?
advertisement
या दुकानात गोल्डन मोदक व डायमंड मोदक विविध आकारात उपलब्ध आहेत. मूर्तीच्या कानात घालण्याची बाळी 30 ते 150 पर्यंतच्या किमतीत मिळत आहे. याशिवाय उंदीर मामांच्या मूर्ती 150 पासून ते 700 पर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. गोल्डन पानसुपारी 50 रुपयांना मिळत असून डायमंड पानसुपारीची किंमत 180 रुपयांपासून सुरू होते.
बाप्पाला अतिशय प्रिय असलेलं जास्वंदीच्या फुलाचे दर 120 ते 300 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजूबंदांची किंमत 800 रुपयांपासून सुरू होते. सोनेरी मुकुटाच्या किमती 350 रुपयांपासून तर सोंड पट्टीच्या किमती 350 रुपयांपासून सुरू होते. जास्वंदाच्या फुलांची कंठी 800 रुपयांमध्ये मिळत आहे. या दुकानात बाप्पासाठी आकर्षक शस्त्रेही उपलब्ध असून त्यांची किंमत 250 रुपयांपासून सुरू होते.
जयश्री कलेक्शनमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक दागिन्यांमध्ये विविध डिझाईन्स आणि प्रकार उपलब्ध आहेत. या ठिकाणी कमी किंमतीत उत्तम दर्जाचे आणि आकर्षक दागिने मिळत असल्याने या दुकानाला गणेशभक्तांची पसंती मिळत आहे. तुम्हाला देखील बाप्पाच्या सजावटीसाठी आकर्षक दागदागिने हवे असतील तर हे दुकान एक उत्तम पर्याय ठरू शकतो.