Coconut Prices: श्रावणात ग्राहकांच्या खिशाला कात्री, नारळाच्या दरात एवढ्या रुपयांनी वाढ, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Coconut Prices: सध्या श्रावण महिना सुरू आहे. यामुळे धार्मिक पूजेसाठी लागणाऱ्या नारळांची मागणी वाढली आहे.
मुंबई: सध्या श्रावण महिना सुरू आहे. यामुळे धार्मिक पूजेसाठी लागणाऱ्या नारळांची मागणी वाढली आहे. दक्षिण भारतातून येणारा पुरवठा घटल्याने नारळाचे दर वाढले आहेत. याचा परिणाम ग्राहकांवर होत आहे.
किती रुपयाला मिळत आहे नारळ?
श्रावण महिना हिंदू कॅलेंडरमधील एक पवित्र महिना आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. अनेक भक्त उपवास करतात, विविध पूजा आणि विधी करतात, मंत्रांचा जप करतात आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान करतात. धार्मिक पूजेसाठी नारळांची खरेदी करतात. श्रावण महिन्यापूर्वी पूर्वी 25 ते 35 रुपयांना विकले जाणारे नारळ सध्या 40 ते 50 रुपयाला विकले जात आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
advertisement
श्रावण महिना सुरू झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई परिसरात नारळांची मागणी वाढली आहे. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आणि कीड लागवडीमुळे उत्पादन घटले. त्यामुळे महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये नारळाचा पुरवठा घटला आहे. पुरवठा आणि मागणी यामधील असमतोलांमुळे दर वाढले आहेत, अशी माहिती वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 9:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Coconut Prices: श्रावणात ग्राहकांच्या खिशाला कात्री, नारळाच्या दरात एवढ्या रुपयांनी वाढ, कारण काय?