त्यापूर्वी जाणून घेऊयात हिवाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट म्हणजेच पोटाचे विकार का वाढतात ?
हिवाळ्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच पोटांच्या आजारांचं प्रमाण वाढतं. आधी सांगितल्या प्रमाणे हिवाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असते. अशातच हिवाळ्यातलं थंड वातावरण हे जीवाणू, विषाणू आणि पॅरासाईट यांच्या वाढीसाठी अनुकूल मानलं जातं. ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस, नोरोव्हायरस आणि रोटाव्हायरस असे जीवाणू, विषाणू, सक्रिय होतात. हे दूषित अन्न, पाणी किंवा पृष्ठभागाद्वारे शरीरात सहज प्रवेश करतात आणि आपल्याला सुरू होतो तो पोटाचा त्रास. हिवाळयात शिळं किंवा खराब झालेले अन्न खाल्ल्याने साल्मोनेला किंवा ई.कोलाय सारख्या जिवाणूंच्या संक्रमणाचा त्रास होऊ शकतो. तर काही जणांना दूषित पाणी प्यायल्यामुळे जीआरडिआयसीस(giardiasis) चा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात पोटाच्या संक्रामित आजारांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर काहीही खाण्यापूर्वी विचार करा. उघड्यावरचं अन्न खाणं टाळलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
advertisement
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शनची लक्षणं:
तुम्हाला डायरिया, पोटदुखी, पेटके, उलट्या असा त्रास सुरू झाला तर समजून जा की तुम्ही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास सुरू झालाय. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या इन्फेक्शनचं रूपांतर गंभीर आजारात व्हायाला वेळ लागणार नाही. अशा स्थितीत तुम्हाला रूग्णालयात ॲडमिट होण्याशिवाय कोणता पर्याय राहिलेला नसेल.
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची कारणं आणि लक्षणं जाणून घेतल्यानंतर आता जाणून घेऊयात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शन टाळण्याचे उपाय
स्वच्छता पाळा:
आपण नेहमी म्हणतो स्वच्छता ही निरोगी आरोग्याची किल्ली आहे. त्यामुळे तुम्हाला निरोगी राहायचं आहे तर स्वच्छता पाळायलाच लागेल. त्यामुळे हिवाळ्यात पोटाचे विकार टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळणं फार महत्त्वाचं आहे. काहीही खाण्यापूर्वी तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. शौचालयाला जाऊन आल्यानंतर हातपाय धुण्यास विसरू नका.
शिळं अन्न खाणं टाळा:
अन्न तयार करताना स्वच्छता ठेवा. आवश्यकतेनुसारच अन्न तयार करा. अनेक दिवसांसाठी अन्न साठवून ठेवणं टाळा. शिळ अन्न खाऊ नका. दूषित पाण्यापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी फिल्टर केलेले पाणी प्या. जर तुमच्याकडे फिल्टर नसेल तर तुम्ही पाणी उकळूनही पिऊ शकता.
हे सुद्धा वाचा : तुम्हाला जास्त थंडी वाजतेय; कारणीभूत आहेत ‘हे’ आजार, दुर्लक्ष करणं पडेल महागात
पोषक आणि पूरक आहार घ्या :
जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्ही पोटाच्या आजारांचा धोका टाळू शकता. पोट आणि आतड्यांचं आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन, फायबर्स आणि प्रोबायोटिक्स असलेली फळं आणि अन्न पदार्थांचा आहारात समावेश करा. चांगली रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी, पाणी पिऊन तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवा. पुरेशी झोप घेतल्यानेही तुमच्या शरीराला विविध फायदे होतात.
संक्रामित व्यक्तींपासून दूर राहा:
आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणं टाळा. त्यांचं सामान, भांडी, रुमाल, कपडे, टॉवेल इत्यादी वापरू नका. तुम्हालाही संसर्गाची लक्षणं दिसली तर वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात तुम्ही जी.आय संसर्गाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता आणि हिवाळ्यात या आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकता.