लाडूसाठी लागणारे साहित्य
एक वाटी जवस, अर्धा वाटी अक्रोड, अर्धा वाटी खजूर, एक वाटी गूळ, दोन चमचे पंपकिन सीड, एक चमचा खसखस आणि थोडसं तूप एवढे साहित्य लागेल. जवस, अक्रोड आणि पंपिंग सीड यामध्ये ओमेगा थ्री हे मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत.
लाडू बनविण्याची कृती
advertisement
सर्वप्रथम एक वाटी जवळ हा चांगल्या रीतीने भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडसं तूप टाकून अक्रोड भाजायचं आणि पंपिंग सीड देखील भाजून घ्यायच्या. त्यानंतर थोडसं तूप टाकून खजूर देखील चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. आता हे भाजून घेतलेले साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. एका पॅनमध्ये थोडसं पाणी घालायचं आणि त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा गुळ व्यवस्थित रित्या पातळ करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस टाकायचे.
ते व्यवस्थित रित्या त्यामध्ये भाजून घ्यायची. हे सर्व भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण पावडर तयार करून घेतली आहे ती टाकायची आणि एकजीव करून घ्यायचं. आणि एक छोटा चमचा भरून त्यामध्ये तूप देखील तुम्ही टाकू शकता. सर्व एकत्र करून एकजीव करून घ्यायचं. आणि थोडसं थंड झाल्यानंतर तुम्ही याचे लाडू तयार होतात. तर अशा सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे त्यांना नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.