केसांच्या समस्यांवर एक चांगला आणि नैसर्गिक उपाय म्हणजे बिया. या बियांमुळे, शरीर निरोगी राहतंच, शिवाय केसांच्या वाढीलाही मदत होते. जवसाच्या बिया, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजं आढळतात. यामुळे केसांच्या रोमांना पोषण मिळतंच आणि टाळूही निरोगी राहतो. या बियांमुळे, रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे केस लांब आणि जाड होतात.
advertisement
Burnout : बर्न आऊट म्हणजे काय ? बर्न आऊटचा शरीरावर काय परिणाम होतो ?
केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचा साठा भोपळ्याच्या बियांमधे भरपूर प्रमाणात आहे. यात झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिनं असतात, केसांच्या वाढीसाठी हे घटक फायदेशीर मानले जातात. भाजून किंवा सूपमधे आणि सॅलडमध्ये घालून खाऊ शकता.
जवसाच्या बियांमधे ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं, केसांच्या रोमांचं यामुळे पोषण होतं. त्यामधे लिग्नान्स आणि अँटीऑक्सिडंट्स देखील मोठ्या प्रमाणात असतात, केसांच्या वाढीसाठी हे फायदेशीर आहेत.
Crash weight loss : वेगानं वजन कमी होणं तब्येतीसाठी हानिकारक, जाणून घ्या कारणं
आहारात जवसाच्या बियांचा समावेश केल्यानं केसांच्या वाढीला मदत होऊ शकते. स्मूदी आणि सॅलडमधे खाऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा वापर होतो तसंच यातले ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे केसांच्या वाढीला चालना देण्यास मदत होते. स्मूदी किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता.
