नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही रंगाचं महत्त्व सांगणारे, देवीची विविध रुपं, असे फोटो तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेसस, डीपाला किंवा इतर सोशल मीडियावर ठेवले असाल. आता कोजागिरीसाठीही असेच शुभेच्छांच्या मेसेज, स्टेटस आणि फोटो तुमच्यासाठी. 2025 सालातील कोजागिरी 6 ऑक्टोबर, सोमवारी आहे. त्याआधी हे शुभेच्छा मेसेज, डीपीसाठी फोटो, स्टेटस सेव्ह करून ठेवा.
advertisement
मावळतीची घाई झाली सूर्यास,
कारण आज चमकण्यास आला आहे
कोजागिरीचा चंद्र नभात.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Kojagiri Wishes Photo : पौर्णिमेचा चंद्र हसतो, Whatsapp DP, Status साठी कोजागिरी शुभेच्छा फोटो
------------------------------------------------------
तोच नेहमीचा चंद्रमा नभी,
अन चांदणी माझ्या दारी उभी,
कोजागिरीला वेगळेच जग पृथ्वीवरी,
जसे गगनाची दुनिया पृथ्वीवरी उभी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------------
मंद गतीने पाऊलं उचलत,
चांदण्याचा प्रवास सुरू झाला,
दडला होता ढगात हा चंद्र,
पदरात जसा मुख चंद्र लपलेला…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीच्या चंद्राची किरणे खेळत होती पाण्यात,
चांदणी रात पसरली होती धरती आणि अंबरात.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
----------------------------------------------
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय
आज रात्र अपुरी आहे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
----------------------------------
प्रत्येकाचा जोडीदार,
त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा आणि कधी कधी वाघोबा होतो,
निराशेचे ढग हटवून,
झाले गेले विसरून जाऊ,
आजच्या रात्री शुभ्र चांदण्यात,
एकमेकांचे होऊन जाऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
------------------------------------------
साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आकाशगंगा तेजोमय झाली,
नभात चंद्रफुलांची उधळण झाली,
कोजागिरीचा चंद्र पाहण्या वसुंधराही आतूर झाली.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
-----------------------------------------
दूध हे केशरी,
कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि
आयुष्यभर मिळावी आपली साथ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!