TRENDING:

Happy Navratri Wishes : घटस्थापना घटाची, नवदुर्गा स्थापनेची; अशा द्या नवरात्रीच्या शुभेच्छा

Last Updated:

Happy Navratri Wishes In Marathi : नवरात्रीसाठीही तुम्ही तुमच्या प्रियजननांना देण्यासाठी शुभेच्छा मेसेज शोधत असाल तर एकापेक्षा एक हटके असे शुभेच्छा मेसेज आम्ही तुमच्यासाठी एकाच ठिकाणी घेऊन आला आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गणेशोत्सव संपला की सगळ्यांनाच वेध लागतात ते नवरात्रीचे. नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा. सोबत गरबा, दांडियाही आलाच. पण यात आणखी एक गोष्ट म्हणजे कोणताही सण असला की शुभेच्छा आल्याच. नवरात्रीसाठीही तुम्ही तुमच्या प्रियजननांना देण्यासाठी शुभेच्छा मेसेज शोधत असाल तर एकापेक्षा एक हटके असे शुभेच्छा मेसेज आम्ही तुमच्यासाठी एकाच ठिकाणी घेऊन आला आहोत.
News18
News18
advertisement

नवरात्रीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हे मेसेज. जे तुम्ही फोटो म्हणून किंवा टेक्स्ट म्हणूनही पाठवू शकता. तसंच तुम्हाला प्रत्येकाला मेसेजवर शुभेच्छा देणं शक्य नसेल तर हे शुभेच्छा मेसेज फोटो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता आणि तुमच्या नवरात्रीच्या शुभेच्छा एका क्लिकवर सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता.

शरदात रंग तसे, उत्सव नवरात्रीचा

advertisement

ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,

महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा

घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

--------------------------------------

शक्तीची देवता दुर्गामाता,

आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान

व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,

हीच देवीचरणी प्रार्थना,

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्रीचे नऊ दिवस,

सण हा मांगल्याचा असे,

advertisement

देवीची नऊ रूपे पाहून,

मन तिच्याच ठायी वसे,

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

--------------------------------------

नवा दीप उजळो,

नवी फुल उमलोत,

नित्य नवी बहार येवो,

नवरात्रीच्या या शुभ दिवशी

तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो,

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

मातृ शक्तीचा वास राहो,

advertisement

संकटांचा नाश होवो,

प्रत्येक घरात सुख-शांती नांदो,

नवरात्रीचा सण सर्वांसाठी खास जावो,

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

--------------------------------------

आईचं हे पर्व घेऊन येतं

हजारो-लाखों आनंदाचे क्षण

या वेळी आई करू दे

सर्वांची इच्छा पूर्ण

शुभ नवरात्री

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो,

advertisement

आणि तुमचे जीवन आनंदमय होवो.

हीच मातेकडे प्रार्थना,

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

--------------------------------------

लक्ष्मीचा हात असो

सरस्वतीची साथ असो

गणपतीचा वास असो

आणि मां दुर्गेचा आशीर्वाद असो

नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती,

ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य

या नऊ गोष्टींची वर्षाव करो

आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना,

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

--------------------------------------

देवी आई वरदान दे

फक्त थोडं प्रेम दे

तुझ्या चरणी आहे सर्वकाही

फक्त तुझा आशीर्वाद दे.

नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाचा

सण गरबा आणि जल्लोषाचा

देवी अंबाबईच्या आगमनाचा

आई भवानीच्या कृपेचा

आपणास आणि आपल्या परिवारास

नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

--------------------------------------

नवा दीप उजळो,

नवी फुल उमलोत,

नित्य नवी बहार येवो,

नवरात्रीच्या या शुभ दिवशी

तुम्हावर देवीचा आशीर्वाद राहो,

शुभ नवरात्री!

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Navratri Wishes : घटस्थापना घटाची, नवदुर्गा स्थापनेची; अशा द्या नवरात्रीच्या शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल