हातानं जेवण्याची सवय घराघरात जोपासली जाते पण त्याचं महत्त्व नव्यानं सांगण्याची वेळ आली आहे. कारण यामुळे काय फायदे होतात हे कळल्यावर आताच्या अनेकांच्या हातातला मोबाईल आणि चमचे बाजूला राहतील आणि हातानं जेवायला सुरुवात होईल.
डायटिशियन शिल्पा अरोरा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, आहारतज्ज्ञांनी याचे आरोग्यकारक फायदे सांगितलेत.
advertisement
पचन सुधारतं - शिल्पा अरोरा यांच्या मते, बोटांनी अन्नाला स्पर्श करता तेव्हा शरीराला खाण्याची तयारी करण्यासाठी एक सिग्नल मिळतो. बोटांमधील मज्जातंतूंचं टोक थेट तुमच्या आतड्यांशी जोडलेलं असतं. यामुळे पाचक घटक सक्रिय होतात आणि अन्न पचण्यास सोपं होतं. म्हणूनच आम्लपित्त किंवा अपचन असलेल्यांना हातानं जेवण्याचा सल्ला दिला जातो.
Retina Day : डोळ्यांविषयी या गोष्टी लक्षात ठेवा, संकेतांकडे दुर्लक्ष नको
खाण्याचा वेग नियंत्रित राहतो - हातानं खाल्ल्यानं प्रत्येक घास हळूहळू, नीट चावून खाण्यास मदत होते. यामुळे पचन योग्य होतं आणि शरीराला पोषण मिळतं. चमच्यानं किंवा काट्यानं खाल्ल्याने अन्न लवकर गिळण्याची प्रक्रिया होऊ शकते, ज्यामुळे पचन बिघडू शकतं.
मेंदू आणि अन्नाचा संबंध मजबूत होतो - आहारतज्ज्ञांनी याबद्दल बोलताना लहानपणीची आठवण सांगितली आहे. पचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू होते हे आपण सर्वजण शाळेत शिकलो. बोटांनी अन्न उचलता, तोंडात आलेल्या लाळेनं पचनाला मदत होते. हातांनी खाल्ल्यानं तुम्ही अन्नाशी अधिक जोडलेले राहता आणि आपण खात असलेल्या जेवणाविषयी जागरूक राहण्यास मदत होते.
आतड्यांतील सूक्ष्मजीव आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त - आतडी निरोगी असतात तेव्हा मेंदू देखील निरोगी असतो. हातांनी खाल्ल्यानं पचन आणि आतड्यांतील सूक्ष्मजीव सुधारतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झोप सुधारते आणि ताण कमी होतो.
Brain Fog : ब्रेन फॉगवर उपचार शक्य आहेत का ? जाणून घ्या लक्षणं, कारणं, उपचारपद्धती
आजकाल बहुतेक जण मोबाईल फोनकडे पाहत जेवतात, ज्यामुळे मन आणि शरीराला अन्नाचे पूर्ण फायदे मिळत नाहीत, कळत नाहीत. हातांनी जेवल्यानं अन्नावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होते, ज्यामुळे लक्ष देऊन खाण्याचं महत्त्व कळतं.
यातला एक महत्त्वाचा भाग शिल्पा अरोरा यांनी सांगितला आहे. हातांनी जेवण्याआधी जेवणापूर्वी हात चांगलं धुण्याचंही महत्त्व आहे. कारण अस्वच्छ हातांनी जेवल्यानं जीवाणू आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. म्हणून, जेवण्यापूर्वी आपले हात साबणानं चांगले धुवा. तसेच, आपली नखं कापलेली आणि स्वच्छ आहेत का याकडेही लक्ष द्या.