TRENDING:

Brain Health : मेंदू सजग ठेवण्यासाठी या सवयी नक्की लावून घ्या, मेंदू तरुण राहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या

Last Updated:

मेंदूचं अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी काही गोष्टी करणं हातात असतं. विचार करण्याची शक्ती कमी करणाऱ्या अकरा सवयींविषयी मेंदूविकार तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. या सवयींमुळे मेंदू सतर्क, सजग राहिल. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वृद्धापकाळात काही आजार सुरु असतात, शरीराच्या तक्रारी जाणवतात. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मेंदू आकुंचन पावणं किंवा स्मरणशक्ती कमकुवत होणं हे केवळ वृद्धत्वाचं लक्षण आहे, पण प्रत्यक्षात, आपल्या काही दैनंदिन सवयींमुळे आपला मेंदू अकाली म्हातारा होतो.
News18
News18
advertisement

मेंदूचं अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी काही गोष्टी करणं हातात असतं. विचार करण्याची शक्ती कमी करणाऱ्या अकरा सवयींविषयी मेंदूविकार तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. या सवयींमुळे मेंदू सतर्क, सजग राहिल.

झोपेचा अभाव: आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू आपला जमा झालेला कचरा स्वच्छ करतो. कमी झोपेमुळे मेंदू लवकर आकुंचन पावतो आणि स्मरणशक्ती कमी होते.

advertisement

Summer Drink : उन्हाळ्यात कोल्ड्रिंकचा मारा नको, या खास घरगुती पेयांनी करा डिहायड्रेशनपासून रक्षण

सतत ताण: दीर्घकाळ ताणामुळे शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे मेंदूच्या स्मरणशक्तीसाठी सर्वात महत्वाच्या भागाचं नुकसान होतं.

लठ्ठपणा: लठ्ठपणा मेंदूचं प्रमाण कमी करू शकतो आणि मेंदूचं वृद्धत्व विशेषतः फ्रंटल लोबमध्ये वाढवू शकतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे.

advertisement

मधुमेह: मधुमेह नियंत्रित केला नाही तर तो मेंदूतील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो. यामुळे मेंदूचं आकुंचन, स्ट्रोक आणि डिमेंशियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

शारीरिक निष्क्रियता: दिवसभर बसून काम केल्यानं मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. याउलट, नियमित व्यायामामुळे मेंदूच्या हिप्पोकॅम्पसचा आकार वाढतो.

श्रवणशक्ती कमी होणं: श्रवणशक्ती कमी झाली असेल आणि त्यावर उपचार केले नाहीत तर, ते डिमेंशियाचं एक प्रमुख कारण ठरु शकतं. श्रवणशक्ती कमी होणं मेंदूच्या काही भागांवर नकारात्मक परिणाम करु शकतं.

advertisement

दृष्टीवर परिणाम : कमकुवत दृष्टी एखाद्या व्यक्तीला बाहेरील जगापासून वेगळं करू शकते. यामुळे मेंदूची उत्तेजना कमी होते, ज्यामुळे विचार आणि समज कमी होऊ शकते.

एकटेपणा: दीर्घकाळ एकटं राहिल्यानं किंवा सामाजिक एकटेपणामुळे डिमेंशियाचा धोका वाढतो आणि मेंदूच्या रचनेत नकारात्मक बदल होतात.

जीवनसत्वाची कमतरता: जीवनसत्व बी12 च्या कमतरतेमुळे आपल्या नसा खराब होऊ शकतात. त्यावर लक्ष दिलं नाही तर मेंदू आकुंचन पावू शकतो आणि विचार करण्याची क्षमता बिघडू शकते.

advertisement

अल्कोहोल : जास्त प्रमाणात अल्कोहोलमुळे, मेंदूचा आकार विशेषतः फ्रंटल लोब्स आणि सेरेबेलममधे लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

धूम्रपान: सिगारेट ओढल्यानं नसा खराब होतात, ज्यामुळे मेंदू जलद वृद्ध होतो.

Iron Deficiency : धाप लागते, दमल्यासारखं वाटतं ? पाहूयात कारणं आणि तज्ज्ञांनी आहारात सांगितलेले छोटे आणि महत्त्वाचे बदल

मेंदू आकुंचन पावण्यापासून कसा रोखायचा?

डॉक्टरांच्या मते, जीवनशैलीत काही सोपे बदल करून तुम्ही तुमचा मेंदू निरोगी ठेवू शकता:

चांगली झोप घ्या: तुमच्या मेंदूला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ द्या.

नियमित व्यायाम करा: शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा.

निरोगी आहार : पौष्टिक अन्न खा.

सामाजिक संबंध राखा: लोकांना भेटा आणि एकाकीपणावर मात करा.

ताणतणाव व्यवस्थापन : स्वतःला मानसिकदृष्ट्या शांत ठेवा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

आरोग्याची काळजी : रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नेहमी नियंत्रणात ठेवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Brain Health : मेंदू सजग ठेवण्यासाठी या सवयी नक्की लावून घ्या, मेंदू तरुण राहण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल