TRENDING:

Guava : पेरु खाण्याचे असंख्य फायदे, हिवाळ्यातलं आवडतं फळ, तब्येतीसाठी गुणकारी

Last Updated:

पेरु शरीरातल्या अनेक कार्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. दैनंदिन गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी देऊ शकणारं हे फळ आहे, पेरुमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते आणि सर्दी कमी करण्यास देखील मदत होते. पाहूयात पेरु खाण्याचे फायदे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पेरू हे सहज मिळणारं आणि बहुतेकांना आवडणारं फळ. पेरु खाताना त्याची चव, रंग पाहण्याकडे लक्ष जातं. पण पेरुमधे भरपूर व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे पेरु अनेक फळांना मागे टाकतो.
News18
News18
advertisement

पेरु शरीरातल्या अनेक कार्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. दैनंदिन गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी देऊ शकणारं हे फळ आहे, पेरुमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते आणि सर्दी कमी करण्यास देखील मदत होते. पेरूमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेमधे कोलेजन तयार करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा मजबूत आणि निरोगी राहते, तसंच हिरड्यांचं आरोग्यही सुधारतं.

advertisement

Preservatives : घरातल्या या पदार्थांना काढा बाहेर, प्रकृतीसाठी आहेत धोकादायक

गोड चव असूनही, पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. पेरू आणि त्याच्या पानांमधील घटक रक्तातील साखरेच्या जलद वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात असं संशोधनातून दिसून आलं आहे.

पेरुमधे भरपूर प्रमाणात फायबर असतं हा घटक पचनासाठी आवश्यक असतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी याची मदत होते आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना यामुळे आधार मिळतो.

advertisement

पेरुमधे पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी हे घटक महत्त्वाचे आहेत. पेरू खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं असं काही अभ्यासातून दिसून आलं आहे.

Weight Gain : घरचं जेऊनही वजन का वाढतं ? काय, कुठे चुकतंय ?

पेरुमधील फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्स हे घटक रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय ठेवतात. त्यात अँटीमायक्रोबियल गुणधर्म देखील असतात, यामुळे शरीराचं बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून संरक्षण करू शकतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोरियन बॅग्सची जोरदार क्रेझ, फक्त 300 रुपयांपासून करा खरेदी,मुंबई हे आहे मार्केट
सर्व पहा

पेरूच्या पानांचा अर्क मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतो. स्नायूंना आराम देण्यास देखील मदत करतो असं काही वैज्ञानिक अभ्यासातून असं आढळून आलं आहे. पेरु हे कमी कॅलरीज असलेलं फळ आहे पण त्यात भरपूर फायबर आणि पोषक घटक असतात. यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहण्यास मदत होते आणि अतिरिक्त खाणं टाळण्यास मदत करू शकते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Guava : पेरु खाण्याचे असंख्य फायदे, हिवाळ्यातलं आवडतं फळ, तब्येतीसाठी गुणकारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल