केशरातल्या दाहक-विरोधी आणि ऑक्सिडायझिंग गुणधर्मांमुळे, निस्तेज त्वचा चमकदार होऊ शकते. कोमट पाण्यात फक्त केसराचे एक-दोन धागे मिसळून प्यायल्यानं त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येते. ही प्राचीन काळापासून वापरात असलेला आयुर्वेदिक उपचार आता सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे.
Skin Care : चेहऱ्यासाठी मोलाच्या टिप्स, निगा राखताना या गोष्टी लक्षात ठेवा
पाहूयात केशराचे फायदे -
advertisement
त्वचेची चमक सुधारते - केशरात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे त्वचा उजळते आणि निस्तेजपणा दूर करते.
केशरातले दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे काळे डाग कमी होतात. त्वचेचा रंग एकसारखा होतो. पचन आणि विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यासाठी केशर उपयुक्त आहे.
सकाळी केशर पाणी पिल्याने चयापचय सुधारतं. शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होतं, पचन सुधारतं आणि सकाळी तुम्हाला ताजंतवानं वाटतं. केशरामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
केशरातील जीवनसत्त्वं आणि खनिजं रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. हंगामी संसर्गापासून संरक्षण होतं आणि शरीराची ऊर्जा पातळी राखली जाते.
ताण कमी करण्यासाठी उपयुक्त - केशरामुळे ताण कमी होऊन मूड सुधारतो. ताणामुळे येणारा थकवा कमी होतो.
या बाबी लक्षात ठेवा -
केशराच्या केवळ दोन-तीन कळ्या आणि कोमट पाणी पुरेसं आहे. केशर जास्त प्रमाणात सेवन केल्यानं शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्वचा संवेदनशील असेल किंवा ऍलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.