प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ रेनिता राजन यांनी या विषयावर एक इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केला आहे. त्या म्हणतात की परफ्यूम थेट त्वचेवर लावता येतो, पण काही खबरदारी घेणं आवश्यक आहे, कारण यामुळे त्वचेची जळजळ किंवा ऍलर्जी होऊ शकते.
कोणताही नवीन परफ्यूम वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट महत्त्वाची
तुमच्या कानांच्या मागे, तुमच्या कोपरांच्या आत, तुमच्या गुडघ्यांच्या मागे किंवा तुमच्या काखेत थोडेसे स्प्रे करा आणि काही तास थांबा. जर खाज सुटणं, जळजळ होणं किंवा पुरळ येत नसेल तर तुम्ही ते तुमच्या त्वचेवर लावू शकता.
advertisement
Health Risk Of The Day : सलाड बिलकुल खाऊ नका, तज्ज्ञांनी का दिला असा सल्ला? सांगितला धोका
शेव्हिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर परफ्युम लावणं टाळा
शेव्हिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर लगेचच तुमच्या अंडरआर्म्सची त्वचा खूप संवेदनशील होते. या काळात परफ्युम लावल्याने जळजळ होऊ शकते. शिवाय त्वचा जास्त प्रमाणात परफ्युम शोषून घेते, ज्यामुळे नुकसान होण्याचा धोका वाढतो.
किती परफ्यूम योग्य आहे?
बरेच लोक असं मानतात की जास्त स्प्रे सुगंध जास्त काळ टिकवतात, परंतु तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की 10-15 स्प्रे त्वचा आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. फक्त एक किंवा अर्धा स्प्रे पुरेसा आहे. जर ते डॅब-ऑन परफ्यूम असेल तर आणखी कमी वापरा.
आईने थंड दही खाल्लं तर तिचं दूध पिणाऱ्या बाळाला सर्दी होते? डॉक्टर काय सांगतात?
त्वचारोगतज्ज्ञ अंघोळ केल्यानंतर लगेच आणि घाम येण्यापूर्वी परफ्यूम लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ शिफारस करतात. यावेळी तुमची त्वचा स्वच्छ असते आणि सुगंध जास्त काळ टिकतो. घाम आल्यानंतर परफ्युम लावल्याने वास आणखी वाढू शकतो.