आईने थंड दही खाल्लं तर तिचं दूध पिणाऱ्या बाळाला सर्दी होते? डॉक्टर काय सांगतात?

Last Updated:

Mother diet effect on baby health : बाळ झाल्यानंतर आईला मसालेदार, तेलकट, थंड पदार्थ खाण्यापासून रोखलं जातं. तिने ते पदार्थ खाल्ले आणि बाळ आजारी पडलं की तिच्या खाण्यापिण्याला दोष दिला जातो.

News18
News18
नवी दिल्ली : जेव्हा एखादी महिला आई बनते तेव्हा तिला आहाराबाबतही पथ्यं पाळायला सांगितलं जातं. विशेषतः आई, आजी, सासू आईला हे खाऊ नको, ते खाऊ नको त्याचा बाळावर परिणाम होतो असं सांगतात. बाळ आईचं दूध पितं त्यामुळे तिने तिखट, थंड काहीही खाल्लं तर त्याचा दुष्परिणाम बाळावर होतो असं म्हटलं जातं. पण खरंच असं होतं का? याबाबत डॉक्टर काय सांगतात?
बाळ झाल्यानंतर आईला मसालेदार, तेलकट, थंड पदार्थ खाण्यापासून रोखलं जातं. तिने ते पदार्थ खाल्ले आणि बाळ आजारी पडलं की तिच्या खाण्यापिण्याला दोष दिला जातो. म्हणजे बाळाला सर्दी झाली आणि आईने दही खाल्लं असेल तर त्यामुळे बाळाला सर्दी झाली असं म्हटलं जातं. आईने आईस्क्रिम खाल्लं आणि बाळाला ताप आला तर आईने आईस्क्रिम खाल्ल्यामुळे बाळाला ताप आला असं म्हणतात. बालरोगतज्ज्ञांनी आईच्या आहाराचा आणि बाळाच्या आजारपणाचा खरंच संबंध आहे का, हे स्पष्ट करून सांगितलं आहे.
advertisement
आईच्या आहाराचा ब्रेस्ट मिल्कमुळे बाळावर परिणाम?
ब्रेस्ट मिल्क आईच्या रक्तातून बनतं. आईने खाल्लेलं थेट ब्रेस्ट मिल्कमध्ये येतं असं नाही. ब्रेस्ट मिल्कमधील कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिन याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. पण हे प्रमाणातच असतं. ते आईच्या आहारामुळे बदलत नाही.
आईचा आहार ब्रेस्टमधील फक्त दोनच गोष्टी बदलतं यातील एक म्हणजे फॅट आणि दुसरं म्हणजे व्हिटॅमिन्स आईने वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स घेतल्यास मुलामध्ये ब्रेस्ट मिल्कच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने फॅट्स जाऊ शकता. जसं की जर आईने तळलेले, तेलकट पदार्थ जास्त खाल्ले तर बाळातही ट्रान्सफॅट जास्त जातात जे हानिकारक आहे. पण जर आई डीएच आणि ईपीए असे चांगले फॅट्स घेत असेल तर मासे, अक्रोडसारख्या पदार्खांतून मिळतात. यामुळे मुलाचा मेंदूचा विकास आणि डोळे चांगले होतात.
advertisement
तसंच आईमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी अशा व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर ब्रेस्ट मिल्कमध्येही हे व्हिटॅमिन्स नसतात आणि बाळामध्येही या व्हिटॅमिन्सची कमतरता दिसते.
त्यामुळे ब्रेस्टफिडिंगच्या कालावधीत आईने घरातील हेल्दी, बॅलेन्स आहार खाणं खूप गरजेचं आहे. पण मुलांना ताप येणं, पोटात दुखणं, शौचास होणं, सर्दी-खोकला होणं हे 99 टक्के प्रकरणात व्हायरल इन्फेक्शनमुळे होतं. त्यामुळे याला आईच्या आहाराशी जोडू नका, असं बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी यांनी सांगितलं.
advertisement
डॉ. पार्थ सोनी यांनी त्यांच्या @dr.parth_peds या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आईने थंड दही खाल्लं तर तिचं दूध पिणाऱ्या बाळाला सर्दी होते? डॉक्टर काय सांगतात?
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement