मासिक पाळीच्या दिवसात डोक्यावरून अंघोळ का करायची? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Menstrual period bathing : मासिक पाळीतील काही नियम ज्यांना काहीच लॉजिक नाही. पण काही नियम असे आहेत, ज्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. डोक्यावरून अंघोळ करणं हा त्यापैकी एक नियम.
नवी दिल्ली : महिलांना येणारी मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया. पण याबाबत माणसांनी अनेक नियम बनवले आहेत. जसं की त्या महिलेला कुणी स्पर्श करू नये, तिने कुणाला किंवा घरातील कोणत्या वस्तूंना स्पर्श करू नये, एका बाजूला बसावं, मंदिरात जाऊ नये, पूजा करू नये... असे एक ना दोन कितीतरी नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाळीच्या दिवसात डोक्यावरून अंघोळ.
मासिक पाळीतील काही नियम ज्यांना काहीच लॉजिक नाही. त्यामुळे आताच्या महिला त्या नाकारतात. पण काही नियम असे आहेत, जे नाकारून चालणार नाही. कारण ते फक्त समज किंवा अंधश्रद्धा नाही तर ज्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. डोक्यावरून अंघोळ करणं हा त्यापैकी एक नियम ज्यामागे वैज्ञानिक कारण आहे.
advertisement
तसं आपली आजी किंवा आई आपल्याला सामान्यपणे मासिक पाळीत डोक्यावरून अंघोळ म्हणजे मासिक पाळीमुळे अशुद्ध झालेलं शरीर शुद्ध करणं असं सांगतात. पण डॉक्टरांनी यामागील खरं कारण सांगितलं आहे.
एकतर पाळी यायला हवी म्हणून आपण डोक्यावरून अंघोळ करतो किंवा पाळी आल्यावर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी अंघोळ करतो.
पाळीच्या काळात शरीरातील उष्णता वाढलेली असते त्यामुळे फ्लो खालच्या दिशेने जातो. जेव्हा आपण डोक्यावरून अंघोळ करतो तेव्हा शरीराचं तापमान बदलतं. पाळीच्या काळात उष्णता वाढल्याने फ्लो खालच्या दिशेने असतो. या काळात डोक्यावरून अंघोळ केली शरीराचं तापमान बदलतं आणि रक्तप्रवाह डोक्याकडे जातो. ज्यामुळे फ्लो किंवा स्राव थांबतो.
advertisement
त्यामुळे पाळी यायच्या आधी किंवा पाळी वेळेवर थांबावी म्हणून चौथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करा. पाळीच्या दिवसात डोक्यावरून अंघोळ केली तर अपचन होतं किंवा थकवाही जाणवतं. त्यामुळे मासिक पाळीबाबतचा हा नियम आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे, असं आयुर्वेदिक डॉक्टर मानसी धामणकर यांनी सांगितलं. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ही माहिती देणारा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Location :
Delhi
First Published :
September 22, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मासिक पाळीच्या दिवसात डोक्यावरून अंघोळ का करायची? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण