काय! दुधामुळे कॅन्सर होतो? डॉक्टरांनीच सांगितला कसा होतो परिणाम

Last Updated:

Is Milk cause cancer : कॅन्सरची तशी अनेक कारणं आहेत. पण काही लोक दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळेही कॅन्सर होत असल्याचं सांगतात. याबाबत डॉक्टर काय म्हणतात?

News18
News18
नवी दिल्ली : कॅन्सर म्हटलं तरी काळजात धस्सं होतं. कित्येक सेलिब्रिटींनाही कॅन्सर झाल्याचा, कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण पाहतो, ऐकतो. कॅन्सर हा असा आजार कधी, कुणाला, कसा होईल सांगू शकत नाही. अगदी हेल्दी आणि फिट दिसणारा माणूसही कॅन्सरचा बळी ठरू शकतो. कॅन्सरची तशी अनेक कारणं आहेत. पण काही लोक दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळेही कॅन्सर होत असल्याचं सांगतात. याबाबत डॉक्टर काय म्हणतात?
दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. दुध आरोग्यासाठी चांगलं म्हणतात. आपण जन्माला आल्यानंतरचा पहिला आहार म्हणजे दूधच. अशा दुधामुळे कॅन्सर होतो असं सांगितलं तर साहजिकच कुणालाही धक्का बसेल. पण खरंच दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे कॅन्सर होतो का? याबाबत कॅन्सर तज्ज्ञांनीच माहिती दिली आहे.
advertisement
दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे कॅन्सर होण्याची तीन कारणं सांगितली जातात.
पहिलं म्हणजे यात आयजीएफ वन वाढतं, IGF-1 हे एक प्रकारचं ग्रोथ हार्मोन आहे जे पेशींना विभाजित करण्यात मदत करतं. प्रत्येक प्रकारच्या प्रोटिनने आयजीएफ वन वाढतं. दुधात केसईन असतं, ज्यामुळेही आयजीएफ वन थोडं वाढतं. पण ही वाढ खूपच कमी असते आणि आयजीएफ वनचा कॅन्सरसोबत स्पष्टपणे थेट संबंध नाही. हे कॅन्सरकडे नेणाऱ्या अनेक प्रकारच्या मार्गापैकी एक आहे. जर आपण दिवसभरात एक लीटरच्या आसपास दूध पित असू तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका थोडा वाढू शकतो, इतकाच याचा पुरावा आहे.
advertisement
दुसरं इन्फ्लेमेशन. इन्फ्लेमेशन काय आहे की जर दूध प्यायल्याने तुमचं पोट खराब होत नाही आहे, गॅस बनत नाही आहे तर दूध तुम्हाला इन्फ्लेमेट करत नाही. लॅक्टोस इंटॉलरेंट असलेल्या लोकांमध्ये दुधाने इन्फ्लेमेशन होण्याचे पुरावे आहेत. पण बहुतेक लोकांना दुधाने इन्फ्लेमेशन होत नाही. खरंतर जे फर्मेंटेट डेरी प्रोडक्स असतात म्हणजे दही, ताक, चीज यामुळे इन्फ्लेमेशन कमी होण्याचे पुरावे आहेत. 
advertisement
तिसरं हार्मोन. हॉर्मोनमुळे समस्या आहेत. विशेषत: ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना. याचा अभ्यासही करण्यात आला आहे. दुधाचा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा थेट संबंधाचे पुरावे नाहीत. जे हार्मोन आपल्याला दुधातून मिळतं ते आपलं शरीर स्वतः बनवतं त्या हार्मोन्सच्या तुलनेत खूपच कमी असतं. याने कॅन्सर होण्याचे अद्याप कोणते पुरावे नाहीत. उलट दही आणि ताकाने कोलोन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.
advertisement
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयेश शर्मा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
काय! दुधामुळे कॅन्सर होतो? डॉक्टरांनीच सांगितला कसा होतो परिणाम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement