Expert Tips : मुलांना सर्दी-खोकला असेल तर केळं द्यायचं की नाही? डॉक्टर काय सांगतात?

Last Updated:

Expert Health Tips : केळी खाल्ली की सर्दी-खोकला होतो असं अनेकांना वाटतं. किंबहुना कित्येक पालक मुलांना सर्दी-खोकला झाला की केळी देतच नाही, पण याबाबत एक्सपर्ट काय म्हणतात.

News18
News18
मुंबई : फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. त्यापैकीच एक फळ म्हणजे केळी. केळी हे असं फळ आहे जे वर्षाच्या बाराही महिने तुम्हाला बाजारात दिसेल. तसंच कुणी आजारी असलं की तुम्ही पाहिलं असेल शक्यतो त्याला भेटायला जाताना बहुतेक लोक केळी घेऊन जातात. कित्येकांचा तर केळी हा नाश्ता आहे. पण केळी खाल्ली की सर्दी-खोकला होतो असं अनेकांना वाटतं. किंबहुना कित्येक पालक मुलांना सर्दी-खोकला झाला की केळी देतच नाही, पण याबाबत एक्सपर्ट काय म्हणतात.
केळी ही चवीला स्वादिष्ठ असतातच यासोबतच त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, फायबर, खनिजेही असतात. दररोज केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातून पोटॅशियम मिळतात. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. केळीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सूज कमी करण्यासही मदत होते आणि आतड्याचं आरोग्य चांगलं ठेवते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे एनर्जी मिळते. व्यायाम झाल्यानंतर स्नॅक्ससाठी केळी गुणकारी आहेत.
advertisement
केळीमध्ये अमीनो एसीड असतं. हे मुड सुधारण्यास मदत करतं. चिंता नैराश्य कमी करण्यास मदत होते जेणेकरुन मानसिक आरोग्यही हेल्दी राहतं. केळीमध्ये अॅंटिऑक्सिडंट असतात. केळीच्या या जीवनसत्त्वामुळे हृदय चांगलं राहण्यास मदत होते. केळीमुळे हाडांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.
advertisement
पण लहान मुलांना केळी द्यायचं म्हटलं की त्यांना सर्दी-खोकला असेल तर द्यायचं की नाही? याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष यादव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्यांनी एक सर्व्हे घेतला. ज्यात पालकांचं मत घेतलं की मुलांना सर्दी-खोकला असेल तर केळं द्यायचं की नाही. 72 टक्के पालकांनी हो म्हटलं आहे, तर 28 टक्के पालकांनी नाही.
advertisement
डॉ. संतोष यादव म्हणाले,  केळी खाण्याचे फायदे काय तर भरपूर कॅलरी, पोटॅशिअम आणि पचनासाठी हलकं. काही मुलांना केळं दिल्यानंतर खूप म्युकस तयार होतो आणि घशातही त्रास होतो. ज्यामुळे मुलांना खूप खोकला येतो. पण याची टक्केवारी खूप कमी आहे. त्यामुळे मुलांना केळी द्या. पण त्यांना मी सांगितला तसा त्रास झाला तर मग नका देऊ. पण सर्दी-खोकला असेल तर केळी देऊ नये, असं काही नाही, हा गैरसमज आहे.
advertisement
पण, काही लोकांसाठी केळी खाणे फायद्याचे नाही, तर हानिकारक ठरू शकते. असे अनेक आजार आहेत, ज्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी केळीचे सेवन केल्यास त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
डॉ. सपना सिंग सांगतात की, केळी अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करत असली तरी, असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी ती हानिकारक ठरू शकते. ॲलर्जी, मधुमेह, किडनीच्या समस्या, दमा किंवा पचनाच्या समस्या असणाऱ्या लोकांशिवाय, इतरही अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना केळीमुळे नुकसान होऊ शकते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Expert Tips : मुलांना सर्दी-खोकला असेल तर केळं द्यायचं की नाही? डॉक्टर काय सांगतात?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement