Expert Tips : दह्यातलं हे पिवळं पाणी चांगलं की खराब, ते तसंच ठेवायचं की फेकून द्यायचं?

Last Updated:

Yellow water in curd : दह्यात असं पिवळं पाणी दिसणं म्हणजे दही खराब झालं असं वाटतं. त्यामुळे संपूर्ण दहीच फेकूनच देतात. पण नेमकं दह्यातलं हे पिवळं पाणी कसलं? त्याचं काय करायचं?

News18
News18
नवी दिल्ली : तुम्ही घरी दही लावलं, सुटं किंवा डब्यातलं दही पाहिलं तर त्यात पिवळं पाणी दिसेल. तुम्ही या पाण्याचं काय करता? बहुतेक लोक हे पाणी फेकून देत असतील. काही जणांना तर दह्यात असं पिवळं पाणी दिसणं म्हणजे दही खराब झालं असं वाटतं. त्यामुळे संपूर्ण दहीच फेकूनच देतात. पण नेमकं दह्यातलं हे पिवळं पाणी कसलं? त्याचं काय करायचं? याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
दह्यातचं पिवळं पाणी म्हणजे दह्याच्या विरजणातील निवळ. जेव्हा दही काही वेळासाठी ठेवलं जातं तेव्हा नैसर्गिरित्या हे पाणी तयार होऊन दह्यातून बाहेर येतं. हे खराब पाणी नाही किंवा याचा अर्थ दही खराब झाला असाही नाही. हा दुधातील पाण्यात विरघळलेला असा भाग आहे.
advertisement
हे पाणी म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी लिक्विड सोनंच. यामध्ये बरेच पौष्टीक, शक्तिशली घटक असतात.  यामध्ये मुबलक प्रोटिन असतं, जे मसल्स मजबूत करायला आणि रिपेअर करायला मदत करतं. यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं, ज्यामुळे हाडांना मजबुती मिळते. यात पोटॅशिअम असतं, ते हार्ट आणि नर्व्ह्स फंक्शनला सपोर्ट करतं. यातील झिंक आणि कॉपर रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी चांगलं आहे. यातील प्रोयाबोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.
advertisement
त्यामुळे हे पाणी फेकणं म्हणजे तुम्ही तुम्ही तुम्हाला मिळणारे पोषक घटक फेकून देत आहात. मग आता यापुढे दह्यातील हे पाणी किंवा पूर्ण दही खराब समजून फेकू नका तर ते दह्यातच मिक्स करा किंवा प्या. ते वाया घालवू नका. आहारतज्ज्ञ रजत जैन यांनी त्यांच्या @dietitianrajatjain इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.
advertisement
दह्यातील या पाण्याला तुम्ही आजवर काय समजत होता, त्याचा काय आणि कसा वापर करता ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Expert Tips : दह्यातलं हे पिवळं पाणी चांगलं की खराब, ते तसंच ठेवायचं की फेकून द्यायचं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement