दिल्ली येथील आहारतज्ञ निहारिका जैन सांगतात की, भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील पोशाखच नाही तर जेवणातही फरक आहे. इथे बऱ्याच राज्यांमध्ये दैनंदिन आहारात भात जास्त वापरला जातो, तर उत्तर भारतातील राज्यांमध्ये रोटी हे मुख्य अन्न आहे. इथे डाळींसोबत किंवा भाजीसोबत चपात्या नक्कीच खाल्ल्या जातात. आहारात कडधान्ये म्हणजे डाळी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत असे त्या सांगतात.
advertisement
निहारिका म्हणतात की, आपल्याला अन्नातूनच ऊर्जा आणि पोषण मिळते. अशा परिस्थितीत खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पोषणासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, सॅलड आणि तृणधान्ये. या धान्यामध्ये गहू, बार्ली, हरभरा, बाजरी, ज्वारी, तांदूळ इत्यादी कोणत्याही धान्याचा समावेश असू शकतो. मात्र, सामान्यतः फक्त गहू आणि तांदूळ वापरले जात आहेत.
डाळ-भात प्रेशर कुकरमध्ये बनवल्याने खरंच त्यातील पोषक तत्त्व नाहीसे होतात का?
डाळ-भात की डाळ-चपाती कोणते कॉम्बिनेशन आहे बेस्ट?
आहारतज्ञ सांगतात की, आहारात रोज कडधान्ये खाणे खूप गरजेचे आहे आणि आहाराच्या सवयीनुसार आवडीचे कोणतेही धान्य खाऊ शकतो. मग ते तांदूळ, बाजरी किंवा गहू. ज्या लोकांना प्रोटीनची जास्त गरज असते, त्यांनी रोज डाळ आणि रोटी खावी. गव्हामध्ये 11 ते 12 टक्के प्रथिने असतात. डाळींमध्येही प्रथिने असतात. अशा परिस्थितीत ते प्रथिनांचा उत्तम स्रोत बनवते. गव्हाच्या चपातीमध्येही भरपूर फायबर आणि कॅलरीज असतात.
भात खाण्यास हलका असला तरी अर्ध्या ते 1 तासात पचतो. कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त, त्यात भरपूर पाणी असते, म्हणूनच ते पोटासाठी चांगले असते. यासोबतच कडधान्ये मिळून शरीरासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 20 प्रकारच्या अमिनो ॲसिडची साखळी पूर्ण करून शरीराला पोषक तत्त्वे पुरवतात. तांदूळ आणि मूग डाळ यापासून बनवलेल्या खिचडीला पूर्ण आहार असेही म्हणतात.
टोमॅटोच्या हा भाग म्हणजे जणू विषच! जास्त खात असाल तर व्हाल 'या' आजाराचे रुग्ण..
त्यामुळे लोकांनी रोजच्या आहारात डाळ, भात आणि रोटी खाल्ले तर उत्तम. परंतु, रोज खाणे जमत नसेल तर वेगवेगळ्या दिवशी खावे. डाळीसोबत भात आणि रोटी दोन्ही खाल्ल्याने फायदा होतो. मात्र, असे काही रोग आहेत ज्यामध्ये ग्लूटेनमुळे समस्या उद्भवतात, अशा परिस्थितीत अशा लोकांना गहू न खाण्याचा सल्ला दिला जातो. असे लोक बार्ली आणि बेसनपासून बनवलेल्या चपात्या खाऊ शकतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
