अनेक नोकरदार स्त्रिया कामाच्या व्यापामुळे मोठ्या प्रमाणात धूम्रपान करतात. पुणे शहर हे आपल्या राज्याचे 'आयटी हब' म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक तरुणी व स्त्रिया नोकरी करतात. मात्र, कामाचा ताण, कामाचे वाढते तास, घरातील जबाबदाऱ्या, अपुरी झोप अशा अनेक कारणामुळे महिलांचा मानसिक तणाव वाढत आहे. यामुळे डिप्रेशन, डोकेदुखी, थकवा अशा प्रकारच्या समस्या स्त्रियांना जाणवतात. या तणावाला दूर करण्यासाठी त्या धूम्रपानाचा आधार घेतात. मात्र, धूम्रपानामुळे महिलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहेत.
advertisement
Health Tips: वजनाने त्रस्त आहात? घरगुती उपायांचा अवलंब केल्यास होईल फायदा
डॉ. रवी पवार म्हणाले, "धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांना फुप्फुसाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. जास्त प्रमाणात धूम्रपान केल्यामुळे त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीम व कार्डियाक सिस्टीमवर परिणाम होतो आणि कालांतराने कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. फुप्फुसांच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी धूम्रपान पूर्णपणे थांबवून नियमित आरोग्य तपासणी करून घेणं गरजेचं आहे. दिवसभर ताण तणावात काम करणाऱ्या तरुणी आणि स्त्रियांना मानसिक आधार देण्याची गरज आहे."
आयटी क्षेत्रातील स्त्रियांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक
आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आणि तरुणींमध्ये धूम्रपान करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मानसिक तणाव, कामाचे वाढते तास, नाईट शिफ्ट आणि नेहमी लॅपटॉप आणि मोबाईलवर ऑनलाइन राहण्याची गरज या कारणांमुळे आयटी क्षेत्रातील तरुणींमध्ये धुम्रपानाचे प्रमाण वाढले आहे.
आरोग्याची हानी
सिगारेट प्यायल्याने स्त्रियांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. शिवाय, यामुळे प्रजनन क्षमता देखील कमी होऊ शकते. स्मोकिंगमुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि अंडाशयांचं नुकसान होते. जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि गर्भधारणेची शक्यताही कमी होते.
'नो स्मोकिंग' झोन आवश्यक
आयटी कंपन्यांनी ऑफिस परिसरात 'नो स्मोकिंग झोन' म्हणजेच धूम्रपान मुक्त धोरण राबवण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन सत्रांचे आयोजन केल्यास कर्मचारी व्यसनांच्या आहारी जाणार नाहीत. याशिवाय, ऑफिसमध्ये आरोग्य जनजागृती केल्यास सकारात्मक परिणाम होऊ शकतात.