रांची : डॉक्टर सांगतात की, शरीर आतून स्वच्छ नसेल तर आजारपणाला आमंत्रण मिळतं. त्यामुळे दररोज पोट साफ होणं अत्यंत आवश्यक असतं, शिवाय संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यासाठीही घरगुती उपाय करावे. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे कलिंगडाचा रस. उन्हाळ्यात कलिंगड भरपूर प्रमाणात मिळतात तेही अगदी परवडणाऱ्या दरात. त्यामुळे हा उपाय करणं अवघड नाहीये.
advertisement
विशेष म्हणजे कलिंगडाच्या रसामुळे केवळ शरीर स्वच्छ होत नाही, तर चेहऱ्यावर छान ग्लोसुद्धा येतो. आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे सांगतात की, शरिराचे बहुतेक आजार यकृतापासून सुरू होतात. मूळत: शरिरात कुठेही जरा जरी घाण असेल, तरी तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे शरीर डिटॉक्स करणं आवश्यक असतं.
हेही वाचा : मुंबईची 'हेलिकॉप्टर भेळ' तुम्ही खाल्ली नाही? धोनीच्या शॉटसारखीच आहे फेमस!
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीर डिटॉक्स होण्यासाठी कलिंगड रामबाण मानलं जातं. या फळात 99% पाणी असतं. ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. शिवाय यात व्हिटॅमिन ए, बी, सी, बी12, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे शरिरातली घाण बाहेर निघतेच, शिवाय शरिराला पोषक तत्त्वही मिळतात. तसंच चेहऱ्यावर तेजही येतं. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडाचा रस आवर्जून पिण्याचा सल्ला दिला जातो.
डॉक्टरांनी सांगितलं की, महागड्या क्रिम्समुळे चेहऱ्यावर जेवढं तेज येत नाही तेवढं कलिंगडाच्या रसामुळे येतं. जेव्हा रक्तातले अशुद्ध घटक बाहेर पडतात तेव्हा चेहरा आपसूक उजळतो. परंतु हा चमत्कार रातोरात होत नाही, तर त्यासाठी जवळपास 2 महिने कलिंगडाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण कोणत्याही पदार्थाचा औषधी वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.