मुंबईची 'हेलिकॉप्टर भेळ' तुम्ही खाल्ली नाही? धोनीच्या शॉटसारखीच आहे फेमस!

Last Updated:

दूरदूरहून खवय्ये इथं आवडीने भेळ खायला येतात. विशेष म्हणजे ते ज्या पद्धतीनं भेळ बनवतात ती पद्धतच प्रचंड व्हायरल झालीये.

एक प्लेट हेलिकॉप्टर भेळ खाल्ली की पोट फुल्ल होतं.
एक प्लेट हेलिकॉप्टर भेळ खाल्ली की पोट फुल्ल होतं.
विश्वजीत सिंह, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत येऊन वडापाव खाल्ला नाही, तर काय खाल्लं, असं आपण अनेकदा ऐकलं असेल...खरंतर मुंबईचा वडापावच नाही, तर सॅन्डविच, पिझ्झा आणि भेळही भारीच लागते. हे पदार्थ तुम्ही एकदातरी खाल्लेच असतील. विशेष म्हणजे इथं या प्रत्येक पदार्थाची व्हरायटी मिळते, ज्यांचा स्वाद अत्यंत खमंग आणि विशिष्ट असतो. तुम्ही आजवर विविध प्रकारच्या भेळ खाल्ल्या असतील पण कधी हेलिकॉप्टर भेळ खाल्लीये का?
advertisement
धोनीचा हेलिकॉप्टर शॉट जेवढा फेमस आहे, तेवढीच अंधेरीत हेलिकॉप्टर भेळ लोकप्रिय आहे. लोक रांगेत थांबून थांबून ही भेळ खातात. ती नेमकी कशी असते, कुठे मिळते आणि किती रुपयांना मिळते, जाणून घेऊया सविस्तर.
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर पूर्वेकडे गुप्ता चना शॉप नावाचं एक दुकान आहे. या दुकानाचे मालक आदित्य सांगतात की, दूरदूरहून खवय्ये इथं आवडीने भेळ खायला येतात. विशेष म्हणजे ते ज्या पद्धतीनं भेळ बनवतात ती पद्धतच प्रचंड व्हायरल झालीये. ते जेव्हा भेळ भांड्यात ठेवून चमच्याने घुसळतात तेव्हा जो आवाज येतो तो हेलिकॉप्टरच्या पंख्यासारखा असतो, म्हणूनच या भेळचं नाव पडलं 'हेलिकॉप्टर भेळ'. विशेषत: कॉलेजच्या विद्यार्थ्यांची इथं मोठी गर्दी असते. भेळसह भेळपूरी, शेवपूरी, दहीपूरी, रगडा पॅटिस, मसाला पॅटिस असे वेगवेगळे पदार्थ इथं 30 रुपये पर प्लेट किंमतीत मिळतात.
advertisement
आदित्य सांगतात की, हेलिकॉप्टर भेळमध्ये मुरमुरे, खजुराची चटणी, लसणाची चटणी, हिरवी चटणी, चणे, शेंगदाणे आणि डाळ मिसळली जाते. शिवाय सोबतीला कांदा, टोमॅटो, लिंबू, जिरा मसाला आणि गरम मसाला असतोच. एक प्लेट हेलिकॉप्टर भेळ खाल्ली की पोट फुल्ल होतं.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईची 'हेलिकॉप्टर भेळ' तुम्ही खाल्ली नाही? धोनीच्या शॉटसारखीच आहे फेमस!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement