Team India : टेस्टसाठी पुन्हा नवा कॅप्टन, अय्यरचं कमबॅक, वेस्ट इंडिज सीरिजआधी लिक झाली टीम इंडिया!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पुढच्या दोन महिन्यांसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. आशिया कपनंतर लगेच 2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टेस्ट सीरिज सुरू होईल.
मुंबई : पुढच्या दोन महिन्यांसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. आशिया कपनंतर लगेच 2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टेस्ट सीरिज सुरू होईल आणि 19 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होईल. त्यामुळे, वेस्ट इंडिज टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीममध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
टेस्ट टीमचा कर्णधार शुभमन गिल सध्या आशिया कपमध्ये व्यस्त आहे आणि भारत फायनलला पोहोचला तर 28 सप्टेंबर रोजी खेळावं लागणार आहे, त्यामुळे त्याला युएईवरून परतण्यासाठी फक्त तीन दिवसांटा वेळ असेल. त्यामुळे, गिल पहिल्या टेस्टला मुकण्याची शक्यता आहे, पण तो दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध असेल. गिलच्या गैरहजेरीमध्ये केएल राहुल पहिल्या सामन्यात टीमचे नेतृत्व करू शकतो, तसंच श्रेयस अय्यरचंही भारतीय टीममध्ये कमबॅक होण्याची शक्यता आहे.
advertisement
पंतच्या कमबॅकचा सस्पेन्स
इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करणारे यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल हे मुख्य ओपनर असतील, तर अभिमन्यू ईश्वरन पुन्हा एकदा राखीव बॅटर असेल. साई सुदर्शन आणि करुण नायर मिडल ऑर्डरमध्ये दिसू शकतात; पण या दोघांपैकी फक्त एक जण खेळण्याची शक्यता आहे. जर ऋषभ पंत त्याच्या पायाच्या दुखापतीतून वेळेत बरा झाला नाही, तर ध्रुव जुरेलला विकेट कीपर म्हणून खेळवलं जाईल, तर एन जगदीशन बॅकअप विकेट कीपर असू शकतो. एन जगदीशन हा सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. जगदीशनने नुकतेच दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये नॉर्थ झोनविरुद्ध 197 रन केल्या होत्या.
advertisement
सरफराजला संधी नाही, अय्यरचं कमबॅक
टीम इंडियाची मिडल ऑर्डर आधीच भरलेली असल्यामुळे सरफराज खानच्या पदरी पुन्हा एकदा निराशा येण्याची शक्यता आहे, पण श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. याशिवाय रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी हे चार ऑलराऊंडरही टीममध्ये असू शकतात. फास्ट बॉलरमध्ये मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांची निवड निश्चित मानली जात आहे.
advertisement
वेस्ट इंडिज सीरिजसाठी संभाव्य भारतीय टीम
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीशन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 11:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : टेस्टसाठी पुन्हा नवा कॅप्टन, अय्यरचं कमबॅक, वेस्ट इंडिज सीरिजआधी लिक झाली टीम इंडिया!