Pune: तो बाइकवर वाट पाहत होता अन् दोघे मागून आले आणि कोयत्याने हल्ला चढवला, पुण्यातला भयानक VIDEO

Last Updated:

रामवाडी परिसरात असणाऱ्या एका आयटी पार्क समोर गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.

अभिजित पोते, प्रतिनिधी
पुणे: मागील आठवड्यामध्ये ऐन गणेशोत्सवाच्या दरम्यान आंदेकर टोळीने आयुष कोमकर या 19 वर्षी मुलाची गँगवारमधून हत्या केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. दुचाकीवर उभ्या असलेल्या एका तरुणावर  कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहे. ही घटना एका आयटी पार्क समोर घडली आहे.
पुण्यात कोयत्या गँगने उच्छाद मांडला आहे. अशातच रामवाडी परिसरात असणाऱ्या एका आयटी पार्क समोर गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. एक तरुण हा बजाज पल्सरवर उभा होता. त्याचवेळी पाठीमागून एका स्कुटीवर तीन तरुण तिथे आले. त्याची दोघे जण या तरुणाच्या जवळ आले आणि त्याला आधी पाठीवर जोराची चापट मारली.
advertisement
दुसरा तरुण हा त्याच्या बाजूने गेला आणि भल्लामोठा कोयता बाहेर काढला. एक जण त्याला धमकावत होता तर दुसऱ्या तरुणाने कोयत्याने त्याला मारहाण सुरू केली. या तरुणाच्या डोक्यावर आधी वार केला. त्यानंतर दुसऱ्या तरुणाने पायाने लाथ मारून त्याची बाईक खाली पाडली. त्यानंतर या तरुणाने कोयत्याने एकापाठोपाठ ९ वार केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे तरुण कमाली घाबरला आणि त्याने तिथून पळ काढून आपला जीव वाचवला.  हा सगळा प्रकार आयटी पार्कमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
या तरुणाने येरवडा पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली आहे. हल्लाचं कारण काय होतं, हे अद्याप समोर येऊ शकलं नाही. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास येरवडा पोलीस करत आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune: तो बाइकवर वाट पाहत होता अन् दोघे मागून आले आणि कोयत्याने हल्ला चढवला, पुण्यातला भयानक VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement