दूध पिऊन घराबाहेर पडणं चांगलं नसतं? का टाळावं बरं...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दूध पिऊन प्रवास करू नये, यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही कारणं आहेत. ज्योतिषी डॉ. कुणाल कुमार झा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीये.
अभिनव कुमार, प्रतिनिधी
दरभंगा : कोणत्याही शुभकार्याला जाताना आपण दही-साखर खाऊन जातो. परंतु कधीच दूध पिऊन शुभकार्याला जात नाहीत, असं का बरं? यामागचं कारण आपल्यापैकी काहीच जणांना माहित असेल. ज्योतिषशास्त्र सांगतं की, कुठेही जाण्यापूर्वी सर्वात आधी चंद्राचा विचार करावा. दुधाचा संबंध हा थेट चंद्राशी असतो असं म्हणतात. ज्योतिषी डॉ. कुणाल कुमार झा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीये.
advertisement
ते सांगतात, दूध पिऊन प्रवास करू नये, यामागे धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही कारणं आहेत. दूध चंद्राला अति प्रिय असल्यानं ते पिऊन बाहेर पडल्यानंतर आपल्याभोवती एक चौकट निर्माण होते. ती चौकट असते राहूशी संबंधित आणि राहू म्हणजे अडचणीच अडचणी.
advertisement
म्हणजेच आपल्या भोवती अडचणींचा वेढा निर्माण होतो. कदाचित आपण ज्या कामासाठी बाहेर पडलो ते होणार नाही, असंही घडू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि चंद्रामध्ये शत्रुत्त्वाची भावना असते. म्हणूनच दूध पिऊन घराबाहेर पडणं अशुभ मानलं जातं. कारण चंद्र आणि राहूचा संबंध आल्यास 'चांडाळ योग' तयार होतो. त्यामुळे आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
advertisement
तर, दुसरं कारण म्हणजे दूध पिऊन बाहेर पडल्यामुळे आपलं पोट बिघडू शकतं. कदाचित जुलाब लागू शकतात. म्हणूनच कधीच घराबाहेर पडताना दूध पिऊ नये असं म्हणतात. एकूणच तब्येत बिघडल्याने आपण ज्या कामासाठी बाहेर पडलो ते कदाचित अपूर्ण राहू शकतं.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Darbhanga,Bihar
First Published :
May 13, 2024 8:59 PM IST