आशा सोडू नका! 4 राशींचं नशीब याच महिन्यात उजळण्याची शक्यता, मग वर्षभर चिंता नाही
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
गुरू ग्रह आपली रास आणि चाल बदलणार आहे. त्याचा ज्या राशीत प्रवेश होईल त्या राशीच्या व्यक्तींना सुखाचे दिवस पाहायला मिळतीलच, शिवाय या राशीप्रवेशामुळे इतर काही राशींचीही चांदी होईल.
उद्धव कृष्णा, प्रतिनिधी
पाटणा : मे महिना अनेकजणांसाठी आनंद घेऊन आलाय. या काळात बहुतेकजणांना विविध कार्यांमध्ये यश मिळेल. ग्रहांची बदललेली स्थिती अनेक राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटेल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. त्याचं कारण म्हणजे गुरू ग्रह आपली रास आणि चाल बदलणार आहे. त्याचा ज्या राशीत प्रवेश होईल त्या राशीच्या व्यक्तींना सुखाचे दिवस पाहायला मिळतीलच, शिवाय या राशीप्रवेशामुळे इतर काही राशींचीही चांदी होईल.
advertisement
ज्योतिषी डॉ. राजनाथ झा यांनी सांगितलं की, वृषभ राशीत जेव्हा गुरू ग्रहाचा प्रवेश होईल तेव्हा त्याचा मेष, वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मकर राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. त्यांची अडकलेली सर्व कामं मार्गी लागतील. शिवाय नव्या कामांचाही श्रीगणेशा होईल. एकूणच शिक्षण, उद्योग, आध्यात्मिक क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळतील, अशी माहिती ज्योतिषांनी दिली. वृषभ राशीनंतर गुरू ग्रह 14 मे 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल.
advertisement
हेही वाचा : Trigrahi Yog 2024: वृषभ राशीत जुळून येतोय 'त्रिग्रही योग', 'या' 3 राशींचा होईल बक्कळ फायदा
मेष : आर्थिक लाभ होईल, त्यामुळे मन प्रसन्न राहील.
वृषभ : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यापाऱ्यांचं उत्पन्न वाढेल.
मिथुन : आपल्यासाठी हा काळ लाभदायी असला तरी आरोग्याची काळजी घ्या
advertisement
कर्क : आपल्याला कामातून खूप फायदा मिळेल. आपले अडकलेले पैसे आता परत मिळतील.
सिंह : विनाकारण वादात पडाल, परंतु कार्यक्षेत्रात फायदा होईल.
कन्या : आपल्याला या काळात आरोग्य उत्तम साथ देईल. कामातही यश मिळेल.
तूळ : कामाच्या व्यापामुळे तणाव येईल, खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : धनलाभ होण्याची शक्यता आहे. शिवाय समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
धनू : खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा, आरोग्य बिघडू शकतं. उत्पन्नाचे मात्र नवे स्रोत निर्माण होतील.
मकर : आपलं आरोग्य उत्तम राहील, कामातही नफा होईल.
कुंभ : मित्रांच्या साथीने काही विशेष कार्य पार पाडाल, आपला मान-सन्मान वाढेल.
मीन : आपल्याला जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रवासाचा योग आहे.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Patna,Bihar
First Published :
May 13, 2024 6:36 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आशा सोडू नका! 4 राशींचं नशीब याच महिन्यात उजळण्याची शक्यता, मग वर्षभर चिंता नाही