TRENDING:

Flax Seeds : रोज एक चमचा जवस खा, त्वचेत जाणवेल फरक, केसांसाठीही ठरेल उपयुक्त

Last Updated:

भारतीय स्वयंपाकातला एक नेहमीचा पदार्थ म्हणजे जवस...विशेषत: हिवाळ्यात, आरोग्यासाठी जवस अधिक फायदेशीर आहे. तंतुमयता, प्रथिनं आणि ओमेगा 3 असलेल्या जवसाचा आहारात नक्की समावेश करा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : निरोगी आरोग्यासाठी आहार परिपूर्ण असणं आवश्यक आहे. यातला प्रत्येक घटक तब्येतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे प्रत्येकानं याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. भारतीय स्वयंपाकातला एक नेहमीचा पदार्थ म्हणजे जवस...विशेषत: हिवाळ्यात, आरोग्यासाठी जवस अधिक फायदेशीर आहे. तंतुमयता, प्रथिनं आणि ओमेगा 3 असलेल्या जवसाचा आहारात नक्की समावेश करा.
News18
News18
advertisement

जवस अतिशय उष्ण असतात, त्यामुळे खाताना त्याचं प्रमाण नेहमी लक्षात ठेवा. यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी 1 म्हणजे थायमिन, बी 6 म्हणजे पायरीडॉक्सिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील चांगल्या प्रमाणात असतात. त्यांच्यामध्ये एक विशेष घटक आढळतो, लिग्नॅन्स, जो एक अतिशय प्रभावी अँटी-ऑक्सिडंट आहे. कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी जवस खूप फायदेशीर आहे. फायबर भरपूर प्रमाणात असल्यानं जवस पचनसंस्थेला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.

advertisement

Gastric problems : गॅसच्या समस्येवर हा उपाय नक्की करुन पाहा, पोटातील गॅसपासून मिळेल आराम

आपल्या आहारात जवस अशा प्रकारे समाविष्ट करा -

जवस दही, स्मूदी किंवा सॅलडमध्ये मिसळून घेता येतं. या बिया भाजून बारीक करुन घ्या आणि सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा खा. या बिया कच्च्याही खाता येतात.

जवसाचे फायदे :

advertisement

कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त

जवसाची पावडर कोमट पाण्यासोबत रोज रिकाम्या पोटी घेतल्यानं पोट स्वच्छ होतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. म्हणून कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.

हृदय आरोग्य

जवस खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. यातील मॅग्नेशियम देखील हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

advertisement

Walk empty stomach : रिकाम्या पोटी चाला, तब्येत राहिल तंदुरुस्त, मानसिक आरोग्यही राहिल चांगलं

पचन व्यवस्थेसाठी उपयुक्त

जवसामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे पचनसंस्थेचं कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटल्यानं जास्त खाणं टाळण्यास मदत होते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

advertisement

जवसाच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय यामध्ये आढळणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं आणि सुरकुत्या कमी होतात.

हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त

जवसाच्या बियांमध्ये असलेलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडं मजबूत ठेवण्यात मदत होते. यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतं आणि तणावापासून संरक्षण करतं. या बियांमध्ये असलेले लिग्नन्स महिलांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात आणि त्यामुळे होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या टाळतात.

प्रमाणाकडे लक्ष द्या

जवसांत प्रचंड गुण आहेत यात शंका नाही, पण त्याचा आहारात समावेश करण्यासाठी त्याचं प्रमाण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, जवस एका दिवसात एक चमच्यापेक्षा जास्त खाऊ नये. जवस खूप उष्ण असल्यानं जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास हानी होण्याचा धोका असतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Flax Seeds : रोज एक चमचा जवस खा, त्वचेत जाणवेल फरक, केसांसाठीही ठरेल उपयुक्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल