व्हिटॅमिन बी 12 हा घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. व्हिटॅमिन बी 12 आपल्या पेशींमध्ये डीएनए तयार करण्यासाठी आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते. आपल्या शरीरात या जीवनसत्वाची कमतरता असेल तर अशक्तपणा, थकवा, अशक्तपणा जाणवतो आणि काहींना शरीरावर सूज देखील येते.
Dryfruits with Honey : शरीराला द्या पौष्टिक खाद्य, सुका मेवा मधात भिजवून खा, तब्येत राहिल ठणठणीत
advertisement
व्हिटॅमिन बी 12 हे आपल्या शरीरात स्वतः तयार होत नाही, त्यामुळे यासाठी आपल्याला बाह्य स्रोतांची मदत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत, ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळतं अशा पूरक घटकांचं सेवन करणं महत्वाचं आहे, मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी12 मुबलक प्रमाणात आढळतं.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात कशी करावी
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आपला आहार आणि जीवनशैली सुधारणं फायदेशीर ठरु शकतं. पोषणतज्ज्ञांच्या मते, शरीरातील या व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही हिरव्या मुगाचं पाणी पिऊ शकता. ज्यांना व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवते, त्यांनी मुगाचं पाणी प्यायलं तर ही कमतरता दूर होण्यास मदत होते.
Hibiscus : केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक उपाय, जास्वंदाच्या फुलांचा आणि पानांचा करा वापर
कृती :
रात्री झोपण्यापूर्वी एक कप हिरवे मूग नीट धुवून स्वच्छ करा आणि पाण्यात भिजवा. सकाळी हे पाणी प्या. याशिवाय उरलेल्या कडधान्यांमध्ये कांदा आणि लिंबू घालून खाऊ शकता.