कडक उन्हात, उष्माघात आणि डिहायड्रेशन या समस्या वाढतात. पण उष्णतेच्या लाटेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला त्रासही होतो. कडक उन्हात प्रकृती चांगली ठेवायची असेल तर शक्य तितकं पाणी प्या.
Summer Skin Care : सनस्क्रीन वापरताना राहा सावध, डोळ्यांंचं होऊ शकतं नुकसान
पण पाणीही खूप प्यायलं जात नाही. अशा वेळी, लिंबू पाणी, नारळ पाणी, रस पिऊ शकता. उष्णतेचा तडाखा वाढला तर लिंबू पाण्यात काळं मीठ मिसळून पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. या पेयामुळे, शरीराचं अनेक समस्यांपासून संरक्षण होऊ शकतं.
advertisement
1. उष्णतेवर मात करण्यासाठी उपयुक्त -
लिंबू पाणी आणि काळं मीठ हे मिश्रण शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरु शकतं. या पेयामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यासही मदत होते.
2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -
लिंबू पाण्यात काळं मीठ मिसळून प्यायल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. कारण मजबूत रोगप्रतिकारक शक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून वाचवण्यास मदत करते.
Summer Skin Care : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, क्रिम नाही आधी पोटाचं आरोग्य तपासा
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त -
लिंबू पाणी आणि काळं मीठ या मिश्रणामुळे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. दररोज हे पेय प्यायल्यानं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
4. पचनासाठी उपयुक्त -
काळं मीठ आणि लिंबू हे दोन्ही घटक पचन सुधारण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे आम्लता आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. पोटाशी संबंधित समस्या यामुळे कमी होऊ शकतात.